श्री क्षेञ उमरज विकासासाठी कुणाच्याही दारला जाण्याची वेळ येऊ देणार नाही : माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

कंधार ( दिगांबर वाघमारे )

 

श्री क्षेञ उमरज व परीसरातील गावातील जनतेंना कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समर्थपणे साथ द्यावी येणाऱ्या काळात या भागातील जनतेंना विकास कामासाठी कोणाच्या ही दारात जाण्याची वेळ येऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी विकासकामाच्या भुमिपुजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी केले .

दिनांक 11 आक्टोंबर रोजी श्री क्षेत्र उमरज ता.कंधार येथे माळाकोळी – वागदरवाडी – चोंडी दगडसांगवी – उमरज – तळ्याचीवाडी रस्त्याची पाईप लाईन कामासह सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ व उमरज ता.कंधार येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचा सुशोभीकरण, पर्यटन व सांस्कृतिक विभाग अंतर्गत नामदेव महाराज संस्थान परिसराचा विकास करणे या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती मठाधीपती श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव यांची उपस्थिती होती .

कार्यक्रमास
भारतीय जनतापार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, भाजपा चे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील अंबुलगेकर, तालुकाध्यक्ष किसनराव डफडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव राठोड, कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनुसयाताई केंद्रे, कंधार नगरपालिकेतील माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, सचिन पाटील चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमित पाटील, माजी नगरसेवक व्यंकट मामडे, प्रल्हादराव पाटील फाजगे, घोरपडे गुरुजी, उमरज ग्रामपंचायत सरपंच जयश्री जनार्धन केंद्रे, मधुकरराव डांगे, आसिफ शेख, मामा गायकवाड, बाळासाहेब गर्जे, प्रदीप पाटील फाजगे, बाबाराव पाटिल भुत्ते ,विनोद पाटिल तोरणे, नवनाथ तोरणे, राजेश भुत्ते माधव भुत्ते ,शिवाजी गुट्टे ,बालाजी भिमराव तोरणे, शामराव गायकवाड ,मारोती तोटेवाड ,सदाशिव तोरणे ,विश्वांभर तोरणे ,तीरुपती भुत्ते ,मारोती तोरणे ,विशाल भुत्ते ,भानुदास भुत्ते ,रामराव तोरणे ,प्रकाश तोरणे ,रविंद्र तोरणे ,एकनाथ तोरणे ,नामदेव पंदलवाड ,गोविंद भुत्ते ,गोविंद तोरणे ,नारायण तोरणे ,व्यंकट तोरणे ,वसंत तोरणे ,माधव तोरणे ,आतमाराम भुत्ते ,माधव पाटिल डोंगरगावकर, बालाजीराव पवळे, शासकीय कंत्राटदार सूर्यकांत गुट्टे यांच्यासह परीसरातील कार्यकर्ते व नगरीकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद पाटिल तोरणे यांनी तर सुञसंचलन श्रीराम फाजगे यांनी केले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *