Krishna is a purifier..

आपल्या प्रत्येकाच्या घरात water purifier असतो.. जो पाण्याला स्वच्छ करतो.. त्यातही अनेक कंपन्या , अनेक क्वालीटीज.. अनेक आकार आणि अनेक साईज सुध्दा. प्रत्येकजण आपल्या गरजा , घरातील जागा आणि आर्थिक गणित यानुसार प्युरीफायर आणतो .. पण संपूर्ण शरीर , मन आणि आत्मा यांच्या स्वच्छतेसाठी एकमेव प्युरीफायर आहे आणि तो म्हणजे आपला भगवंत.. खरं तर कालपर्यंत ९ गुण लिहून झाल्यावर मी ही सीरीज थांबवणार होते पण माझी एक वाचक सखी जी नागपुरची आहे .. तिने मेसेज केला की मॅम , अजून कृष्णावर लिहा ना.. फक्त मलाच नाही तर माझ्या फ्रेंड्सना फॉरवर्ड केलेले तुमचे लेख सगळ्याना आवडले..

खरं तर आज दसरा आहे.. साढेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.. आज शस्त्रांची , अवजारांची पुजा होते कारण त्यांनाही चेतना आहे.. त्यांचाही आपण आदर करतो.. आज पुजा झाल्यावर त्यांना कामाला विश्रांती दिली जाते कारण जिथे राम आहे तिथे आराम आहे.. आज आपट्याच्या पानानाही महत्व आहे..
राम / विष्णु/ कृष्ण / विठ्ठल सगळी त्याचीच रुपे पण प्रत्येक रुपात वेगवेगळ्या कारणासाठी तो आला आणि आपल्यासाठी मार्गदर्शक , गुरू , शिक्षक होवून जगण्याचा महामंत्र देउन गेला..

म्हणुन मी त्याला प्युरीफायर म्हणाले कारण त्याच्या नामाने आपली शुध्दी होते.. त्याला अर्पण करुन खाल्ल्याने आपली चेतना शुद्ध होते.. त्याच्या सानिध्यात राहून षड्रीपुवर विजय मिळवून आपलं अंतकरण शुद्ध होतं.. रोज मंदिरात जायची गरज नाही तर घरालाच मंदिर करुन अतिथीना घरात बोलवून प्रसाद खाऊ घातल्याने सुध्दा आपण पवित्र होतो.. krishna is a supreme power…दोन वर्षापूर्वी मी कधीही कोणाचाही जप करत नव्हते कारण मला अर्धवट माहितीच्या आधारावर हरिनाम घ्यायचे नव्हते.. आपण हरिनाम म्हणतो पण हरि कोण माहितच नाही मग शास्त्र न समजून घेता किवा ज्ञान न घेता जप करण्यात काहीही अर्थ नाही.. अभ्यास सुरु झाला आणि जे मिळालं ते सुप्रीम.. माझ्यासारखी स्त्री इतकी बदलू शकते यावर माझाच विश्वास बसत नाही .. हीच ताकद कृष्णाची आहे.. विरक्त व्हायचं म्हणजे सगळं सोडायचं नसुन योग्य निवडायचं असा अर्थ आहे.. अयोग्य सोडायला लागू तेव्हाच योग्य ते जवळ येइल.. देवी देवता आणि भगवंत यातला फरक जाणून घेतला की प्युरीफीकेशन आपोआप होतं.. भक्ती आणि कर्मकांड यातला फरक लक्षात आला की आपण कर्मकांडाच्या मागे न लागता भक्ती करायला लागतो..
इतका स्वच्छ , नितळ या जगात फक्त हाच प्युरीफायर आहे..

अनेक कंपन्या येतील / जातील पण हे कायमस्वरूपी आहे.. ज्याला रिपेअर करायला इंजीनियर ची गरज नाही.. आज दरऱ्यानिमित्ताने स्वतःला शोधून स्वच्छ करायला सुरुवात करा.. फक्त गाड्या स्वच्छ करून काहीही होणार नाही..
सोच बदलो..

#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *