मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी गुदमार्गाच्या आजाराचे निदान न करताच उपचार केल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात – डॉ. विश्वंभर पवार निवघेकर

 

 

मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी गुदमार्गाच्या आजाराचे निदान न करताच रुग्ण उपचार करतात त्यामुळे वरवर तात्पुरता लक्षणीय फायदा होतो. म्हणजेच लक्षणे कमी होतात पण त्या ठिकाणची विकृती, बिघाड, पॅथॉलॉजी कमी होत नाही ती वाढतच राहते. पुन्हा काही खाण्यात आल्यास, प्रवास झाल्यास, जागरण झाल्यास, पुन्हा त्रास होतो व उपचार केल्यास त्रास कमी होतो. . पुन्हा काही कारण घडल्यास त्रास होतो. असे याचे चक्र चालू असते.
रुग्ण हा तात्पुरता उपचार करून व्याधी हा वर्ष, दोन वर्ष, पाच वर्षे, दहा वर्षे, वीस वर्षे अंगावर काढतो. त्यामुळे ती व्याधी पुढील अवस्थेत जाते आणि एका कोंबाचे दोन कोंब, दोन्हीचे तीन, तिन्हीचे चार असे याची संख्या वाढत जाते. त्याच बरोबर त्याचा आकार देखील वाढत जाते, त्यामुळे संडासच्या ठिकाणी किंवा ॲनल कॅनल मध्ये त्याचे जाळे तयार होतात. त्यामुळे संडासची जागा संकुचित किंवा लहान होते अशा प्रकारे मुळव्याधाचे पाळे मुळे खोलवर रुजले जातात.

जास्त दिवस व्याधी अंगावर काढल्यास त्याचे कॉम्प्लिकेशन, दुष्परिणाम किंवा उपद्रव शरीरावर होतात त्यामुळे संडास साफ होत नाही. पोट गच्च किंवा भारी वाटते. पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे भूक लागत नाही. भूक न लागल्यामुळे रक्त कमी होते, हात पाय दुखतात, ओढतात, गळून जातात, थकवा जाणवतो, चिडचिड होते, मन लागत नाही, उदास वाटते , रुग्णामध्ये प्रतिकार शक्ती कमी झाल्यास नपुंसकता येते. कोंबाचे टीबी किंवा कॅन्सर मध्ये रूपांतर होऊ शकते अशा प्रकारे व्याधी अंगावर काढल्यास किंवा योग्य निदान न करता उपचार केल्यास शेवटी मृत्यूला आमंत्रण होऊ शकते.
म्हणून योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांकडून निदान करून उपचार केल्यास वरील उपद्रव्य कॉम्प्लिकेशन टाळता येऊ शकतात .

Dr. surekha pawar
Dr. vishvambar pawar

niwghekar ayurved hospital dr plaza dr line nanded

9881166777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *