कोरडी नाचणीची भाकर..

 

लहानपणाची एक गोष्ट आठवली.. मी ज्या गावात शाळेत जायची त्या गावच्या अलीकडे एक चौक होता.. त्या चौकात एक धनगर वस्ती होती.. त्या वस्तीत जवळपास शंभरी गाठलेला एक धनगर बाबा होता.. म्हादबा त्याचं नाव.. कुटुंबासोबत आणि शेळ्यामेंढ्यासोबत तो तिथेच झोपडीत रहायचा.. शेतात नाचणी पिकायची जोडीला शेळ्यांचं दुध दही हाच रोजचा आहार.. शिक्षण नाही.. प्रचंड गरीबी.. स्वतःचं घर नाही.. मुलं , नातवंडे , सुना यांच्यासोबत तो उघड्यावर वाऱ्यावर रहायचा.. एखादं फडकं गुंडाळलेलं असायचं याशिवाय दुसरे कपडे नाहीत.. आम्हीही सणासुदीला कधी नवीन कपडे घेतले नाहीत तर त्यांना बिचाऱ्याना कुठून मिळणार ना ..

आज काउन्सिलींग करत असताना म्हादबाची प्रकर्षाने आठवण झाली कारण २२ वर्षाच्या मुलाला कॅल्शीअमची कमतरता आहे आणि त्यामुळे त्याची हाडही दुखतात हे तो सहज बोलता बोलता म्हणाला.. काउंसीलींग चा विषय वेगळा होता.. नाचणीत प्रचंड प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे मीही बऱ्याचदा नाचणीची भाकरी करते आणि चवीलाही छान लागते..आम्ही शाळेत जाताना पहायचो त्याची नातवंडं कोरडी भाकरी हातावर घेउन चावत असायचे.. त्यावर चटणीही नसायची.. ९० व्या वर्षीहीच त्या म्हादबाचे सगळे दात मजबुत होते.. साधी रहाणी , घरचं सकस खाणं , दिवाळीत मूठभर पोह्यासाठी तो आमच्या घरी यायचा.. घरी उखळात कांडलेले पोहे चहात घालून तो खायचा आणि निघुन जायचा.. त्यावेळी त्या गुळाच्या चहाला आणि पोह्यानाही जो काही खमंग वास यायचा असं वाटतय आता लिहीताना तो नाकात दरवळतोय.. सकाळी कोथींबीर निवडताना कोथींबीरीला केमिकल चा वास येत होता त्यावेळी जाणवलं रोज आपण विष खातोय .

 

. त्या वेळी चुलीवरची ती कोरडी भाकरही किती खमंग लागायची .. आता या शहरात ना पाण्याला चव .. ना त्या अन्नाला चव.. आणि पौष्टिकता ??ते काय असतय ??.. कशाचाही थांगपत्ता नाही.. फिरून फिरुन पुन्हा पुन्हा पावलं गावाकडे वळु पहात आहेत पण जेव्हा विचार करतो तेव्हा जाणवतं तिथेही लोकांनी शेती सोडली.. कोणालाही मजुरी करायची नाही.. दिवसभर मोबाईल घेउन युट्युब वर व्हीडीओ पहात बसतात… कालच मी घराचं डीप क्लीनींग करुन घेतलं तेव्हा ते दादा म्हणाले , अहो मॅड्म भरपूर कामं येतात पण ही कामं करायला कोणीही मिळत नाही.. कोणाला कष्ट नकोत.. दिवाळी पंधरा दिवसावर आलेय पण फराळाचं काही करायची इच्छाच होत नाही कारण वर्षभर तेच सगळं खातो त्यामुळे त्यात नावीन्य नाही.. बेसन भाजलं तर त्याचा वास बाजूच्या खोलीत येत नाही.. लहानपणी भाजणीचा , लाडवाचा सुवास सगळीकडे दरवळायचा .. हीच खरी दिवाळी असायची.. दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छाही फोनवर आणि घरी येणं जाणं आणि देणं घेणही दुरापास्त..

अंगावर नवीन कपडे नसताना आम्ही साजरी केलेली दिवाळी आणि रोज ऑनलाईन शॉपिंग करत असतानाची दिवाळी यात फरक आहे तो कोरडेपणाचा.. म्हादबा कोरडी भाकरी खाऊन वयाच्या शंभरीत निरोगी आयुष्य जगला आणि आम्ही कोरड्या आणि केमिकलयुक्त विचारांनी गोळ्या खाऊन आयुष्य काढणार यात शंका नाही..

 

मी तर खेड्यात वाढल्याने पदोपदी हा फरक जाणवतो आणि गड्या आपुला गाव बरा असं वाटतं.. पण आताची गावं पाहून वाटतं , भगवंताने मोक्ष द्यावा म्हणजे या घाणीत परत जन्मच नको..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *