मतदारसंघातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार – आमदार श्यामसुंदर शिंदे …! आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार येथील 185 कोटी रुपये विविध विकास कामाचे लोकार्पण संपन्न

 

कंधार= प्रतिनिधी

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निधीतून कंधार तालुक्यातील 185 कोटी रुपये विविध विकास कामाचे उद्घाटन काल दि.15 रोजी कंधार येथे करण्यात आले व 100 खाटांच्या भव्य रुग्णालयाचे थाटात लोकार्पणही आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे, सौ. अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुमित पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, वैद्यकीय अधिकारी महेश पोकळे, डॉ. भगवान जाधव, सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर, शेकाप जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे,राम पाटील गोरे प्रमुख उपस्थित होते.

लोहा कंधार मतदार संघातील शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबि करण्यासाठी व मतदारसंघातील मी मंजूर केलेले सर्व सिंचन प्रकल्प आगामी काळात पूर्णत्वास
नेणार असून मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना दिली.शेतकरी बांधवांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असून, महिला सक्षमीकरण व गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, मी माझ्या काळात कोणावरही अन्याय केलेला नाही, येणाऱ्या काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की, आमदार शिंदे यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून मतदारसंघात आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, कै. गोपीनाथराव मुंडे यांचे पुतळे उभारले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमदार शिंदे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नसून सर्व समावेशक व विकासाचे राजकारण व समाजकारण केल्याचे आशाताई शिंदे म्हणाल्या.यावेळी शिवाजी केंद्रे,नवनाथ बनसोडे,तालुका अध्यक्ष अवधूत पेठकर,महेश पिनाटे,संचालक गिरीश मामडे,बाळू मगनाळे,वसंत मगनाळे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तर सूत्रसंचलन विश्वंभर बस्वंते यांनी केले.

 

 

आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा कंधार तालुक्याला सार्थ अभिमान -भाई गुरुनाथ कुरुडे

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून कंधार शहरात 66 कोटी रुपये कामाचे 100
खाटांच्या भव्य प्रशस्त रुग्णालयाचे शानदार लोकार्पण पूर्ण होत असल्याचा आम्हा कंधार वासियांना सार्थ अभिमान व गर्व असून १०० खाटांची ही भव्य इमारत ही कंधार शहराची शान आहे, सर्व गोरगरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणार असून सर्व कंधारवासीय सदैव आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे ऋणी आहेत, गोरगरिबांचे आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे हे सामाजिक कार्य अलौकिक असून मी आमदार शिंदे यांचे जाहीर अभिनंदन व आभार मानत असल्याचे अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *