मुळव्याध, भगंदर, व फिशर इत्यादि गुदमार्गाच्या उपचारा- विषयी अनेक प्रकारचे गैरसमज आहेत – डॉ. विश्वंबर पवार निवघेकर

 

मुळव्याध, भगंदर वे फिशर इत्यादि गुदमार्गाच्या आजारा विषयी परिपूर्ण माहिती, ज्ञान किंवा नॉलेज नसल्यामुळे त्यांच्या उपचाराविषयी अनेक प्रकाराचे गैरसमज आहेत.

मुळव्याध हा कधीच कमी होत नाही. आयुष्यभर त्याचा त्रास होतो, औषधी उपचाराने देखील कमी होत नाही, ऑपरेशन केल्यावर देखील कमी होत नाही.तो पुन्हा होतो. ऑपरेशन केल्यावर संडासची जागा मोठी होते, संडासवरील नियंत्रण किंवा कंट्रोल जाते. त्यामुळे बारबार संडासला जावे लागते.

त्याचबरोबर ऑपरेशन करते वेळेस रुग्णाला भुल न देताच किंवा बेहोश न करताच ऑपरेशन केले जाते, रुग्णाचे पाय बांधुन वरच्या दिशेने उलटे टांगले जाते, हात देखील बांधले जातात, त्यामुळे ऑपरेशन करते वेळेस खुप त्रास होतो, त्यामुळे रुग्न जोराने ओरडतो, चिरखतो, रडतो. असे एक ना अनेक प्रकारचे गैरसमज मुळव्याधीच्या उपचारा विषयी गैरसमज आहेत.

वरिल गैरसमजाला रुग्ण बळी पडून किंवा अज्ञानामुळे, भीतीमुळे, शरमेमुळे , संकोचित भावनेमुळे कोणाला कसे सांगावे किंवा दाखवावे या विचारामुळे तो रूग्ण तज्ञ डॉक्टरांना दाखवून योग्य निदान करून उपचार न करता गावठी उपचार करतो, घरगुती उपचार, झाडपाला, वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून मोबाईलवरील माहिती बघून, कोणाच्या सांगण्यावरून उपचार करतो किंवा मेडिकल वरच्या औषधी गोळ्या आणतो, असे एक न अनेक प्रकाराचे नानाविध उपचार करतो, अशाप्रकारे तो अंगावर काढतो, वेळ घालवतो, व्याधी लपवतो किंवा अंगावर काढतो, वेळ काढत राहतो.

वरील उपचाराने लाक्षणिक फायदा होतो म्हणजे लक्षणे कमी होतात पण त्या व्याधीची विकृती, पॅथोलॉजी बिघाड कमी होत नाही तो वाढतच जातो व व्याधी पुढील अवस्थेत जाते अशा प्रकारे व्याधीची पाळेमुळे ही शरीरात खोलवर रुजले जातात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम उपद्रव कॉम्प्लिकेशन हे शरीरात होतात आणि त्यातूनच अनेक प्रकारचे नवनवीन रोग उद्भवत जातात म्हणून वरील कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता चुकीचे किंवा गावठी उपचार न करता व्याधी अंगावर न काढता व्याधी न लपवता संकोचित विचार न करता त्याचे दुष्परिणामाचा विचार करता तज्ञ डॉक्टरांना दाखवून मुळव्याध भगंदर फिशर गुदसंकोच Polys Anal Prolaps, Itching, टीबी कॅन्सर इत्यादी गुदमरगाच्या ठिकाणी होणाऱ्या आजाराचे निदान करून उपचार करावे.

Dr vishvambar pawar. Dr surekha pawar.
Niwghekar ayurved hospital dr plaza dr lane nanded. 9881166777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *