मुंबई येथे महायुतीचे लोहा, कंधार विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणून मा. चिखलीकर साहेब मा. महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार यांची भेट घेतली, मी पक्षात मा. खासदार चिखलीकर साहेब यांच्या नेत्रत्वात पक्षाच काम केलेले आहे, त्यामुळे त्यांच्या सोबत महायुतीच्या नेत्यांच्या भेटी घेणं गैर वाटलं नाही पण आज महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे उप मुख्यमंत्री मा. अजीत दादा पवार यांनी पक्षात स्वागत करताना,मी सोबत होतो मला समोर बोलवून ओळख करून दिली.
या वेळी भेटीत मा. अजीत पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा रुमाल माझ्या गळ्यात टाकला मी महायुतीचे नेते म्हणून स्वीकारला पण मी भाजपाचा पाईक आहे माझा आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा काहीही संबंध नाही महायुती म्हणून सोबत आहोत मी माझ्या पक्षाच्या विचारधारेसी बांधील आहे मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता असून भाजपा पक्षाशी मी बांधील आहे महायुतीच्या नेत्यांना भेटलेला व्हिडिओ प्रसार माध्यमा च्या माध्यमातून जनतेत गेला असून माझ्या विषयी गैर समज निर्माण होऊ नये म्हणून खुलासा करत आहे.
मी सामान्य कुटुंबातून समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे,संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन मी समाजात काम करत असून भारतीय जनता पार्टीने अनेक समाज हिताचे निर्णय घेतलेले आहे यासाठी बंजारा समाज पक्षाच्या आणि महायुतीच्या सरकारवर समाधानी आहे बंजारा समाजातून जास्तीत जास्त आगामी निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने मतदानाच्या रूपाने आशीर्वाद राहणार आहे,कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातीलअनेक विकासापासून वंचित बंजारा समाजाचे तांडे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासारखे खंबीर नेतृत्वआमदार राहिल्याशिवाय वाडी तांड्याचा विकास होणार नाही, प्रमाणिक भावना आहे
या मतदारसंघात महायुतीचे आमदार म्हणून नक्कीच चिखलीकर साहेब विधानसभेत जाणार आहेत यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही प्रयत्नाची पराकाष्टा करणार आहोत
मी आज भाजपाचा आहे, व माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. असे भगवान राठोड यांनी सांगितले.