*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकवणार,असा विश्वास माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
माजी खासदार तथा लोहा व कंधार विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शनिवारी, दि.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता संपर्क कार्यालय कंधार येथे पत्रकारांशी संवाद साधला.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला लोहा कंधार विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीची सूचना केली होती. त्यामुळे मी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्याच्या कामाला लागलो होतो. भाजपात असताना मी ‘जीना यहा मरना यहा ‘असे म्हणालो होतो. परंतु महायुती मध्ये लोहा कंधार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाला सुटली. त्यामुळे मला अजित पवार यांनी पक्षात प्रवेश देऊन लगेचच महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली असे प्रतिपादन माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माधवराव धर्माधिकारी,भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर, भाजपचे तालुकाध्यक्ष किशनराव डफडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांनी मला लोहा-कंधार विधानसभेसाठी सन्मानपूर्वक उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी सर्व महायुतीच्या नेत्यांचे जाहीर आभार मानतो. मी सोमवारी,दि २८ऑक्टोबर रोजी लोहा-कंधार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, कृषीमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ.अजित गोपछडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यंदा लोहा विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवणार आहे. मी व माझे कुटुंब नेहमी सर्वांच्या सुख, दुःखामध्ये सहभागी झाले आहे. माझ्या सर्व निवडणुकीमध्ये दलित व मुस्लिम समाज बांधवांनी आशीर्वाद दिला आहे. प्रत्येक समाज घटकांनी मला मोलाची साथ दिली आहे. अशीच साथ पुन्हा एकदा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी ॲड.मारोती पंढरे, ॲड.बाळासाहेब सोनकांबळे, मधुकर डांगे, ज्ञानोबा मुंडे, निलेश गौर,शेख आसेफ,शिवाजी लुंगारे, चेतन केंद्रे, व्यंकट नागलवाड, सौ.वंदना डुमणे,उत्तम लुंगारे, व्यंकट मामडे, गणेश ठवरे, रामकिशन पंदनवड,घोरबाड सर, रजत शहापुरे, शंतनू कैलासे, हणमंत डुमणे आदी उपस्थित होते.