मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम

 

#नांदेड दि २७ ऑक्टोंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद,संकल्प पत्र व #मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार #जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधान सभा मतदार संघात राबवित आहेत. या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले.

नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपल्या आई-वडिलांना, काका-काकू, दादा-वहिनी, आदिंना मी मतदान करणारच असे भावनिक करणारे पत्र लिहून घेण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षकांसह सर्व नवमतदार युवक युवतींना मतदान शपथ दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य कृष्णकुमार नेम्माणीवार, #स्वीप कक्षाचे सर्व सदस्य रमेश मुनेश्वर , शेषेराव पाटील, सुरेश पाटील व प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वीप कक्षाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले. स्वीप कक्षाचे सदस्य तथा नयाकॅम्प किनवटचे केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे संकल्प पत्र लेखनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मुलांनी आपापल्या घरी जाऊन आपल्या मातृभाषेत आई-वडिलांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याविषयी संकल्प पत्र लिहावे , मतदान करणे महत्त्वाचे आहे हा विचार सांगावा.

यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा. रेणुकादास पहुरकर यांनी आभार मानले.
000
#विधानसभानिवडणूक२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *