प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक कर्तव्य पार पाडणे सुलभ – जिल्हाधिकारी राऊत

 

नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचाऱ्यांचे प्रथम #प्रशिक्षण संपन्‍न

#नांदेड दि. 26 ऑक्टोबर : प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्‍य समस्‍यांबाबत सविस्‍तर सुचना देण्‍यात आल्‍या. या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी प्रशिक्षणात केले.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड विधानसभा मतदार संघाच्‍याअंतर्गत, 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण, ईव्हीएम हाताळण्याचे प्रशिक्षणसह आज ग्‍यानमाता विद्याविहार विद्यालय कामठा रोड नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले होते. हे प्रशिक्षण एका सत्रात घेण्‍यात आले.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 16-नांदेड लोकसभा अभिजीत राऊत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) ललितकुमार व-हाडे यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रत्‍यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली.

सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी (रोहयो) ललितकुमार व-हाडे यांनी विस्तृतपणे पॉवर-पॉईंट प्रेझेंटेशनच्‍या (सादरीकरणाच्‍या) माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्‍या पासून ते समाप्‍त होईपर्यंत ची कामे करण्‍याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्‍वपुर्ण माहिती देण्यात आली. निवडणूकीशी संबंधित विविध फॉर्म्‍स कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्‍तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्‍मक व चर्चात्‍मक पध्‍दतीने घेण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण मंचावर विकास बिरादार व तहसिलदार प्रगती चोंडेकर, बालाजी सोनटक्के, इंद्रजित गरड, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.

निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्या बाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्‍यात आली व प्रशिक्षणार्थींच्‍या प्रश्‍नांचे / शंकांचे निरसन करण्यात आले. सत्रातील पहिल्‍या टप्‍प्‍यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्‍प्‍यात प्रत्‍यक्ष ई.व्‍ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्‍यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 900 कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या प्रत्‍येक सत्राच्‍या दुस-या टप्‍प्‍यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि EVM मास्टर ट्रेनर यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट प्रत्यक्ष हाताळणी बाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यांत आले. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्‍दारे मतदान करण्‍यासाठी टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्‍या साठीचा नमुना 12 भरुन घेण्‍यात आला व टपाली मतपत्रिका प्राप्‍त करणेबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली.

या प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्‍यासाठी एकुण 20 टेबलवर 40 कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, रुग्‍णवाहिकेसह वैद्यकीय पथक, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, यांना पाचारण करण्‍यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्‍या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन श्री. विकास बिरादार, तहसिलदार व श्रीमती प्रगती चोंडेकर, तहसिलदार यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी- कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.
000000
#विधानसभानिवडणूक२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *