पैसा श्रेष्ठ की माणसे

त्यांना नक्की त्रास कशाचा झाला ???
पैसा श्रेष्ठ की माणसे ??.. कि दोन्ही ???
आमच्या नात्यातील एक व्यक्ती जी गेले ४ महिने एका आजारपणामुळे त्रस्त आहे.. दोघेही नवरा बायको रिटायर आहेत.. दोघांनाही पेंशन आहे.. दोन्ही मुलं फॉरेनला आहेत.. सुनाही भरपूर कमावत आहेत.. एकंदरीत काय तर आर्थिक परिस्थिती उत्तम.. कधीही आम्ही त्यांना भेटलो कि मुलांना एवढा पगार.. सुन इतके कमावते.. मुलाने इतक्या करोडचा बंगलो घेतला.. त्याच्याकडे इतक्या लाखाची गाडी आहे.. कायम बढाया मारत रहाणार.. एकदा ते भारताबाहेर मुलाकडे काही महिने राहायला गेले होते.. तिथून परत आल्यावर आमच्या कॉमन मित्राने विचारलं, मैत्रीणीना तिकडून चॉकलेट आणली की नाही ??.. त्यावर उत्तर आलं , काहीही आणलं नाही.. तेच मित्र एकदा त्यांना म्हणाले , रिटायर झालास आता आम्हाला पार्टी हवी.. रिटायर होवुन ४ वर्षे झाली अजूनपर्यंत एक कप चहाही पाजला नाही.. फक्त करोडोच्या गोष्टी .. हातून काहीही सुटत नाही हा अनुभव मीही अनेकदा घेतला आहे आणि तुम्ही सुध्दा अशा प्रकारच्या अनेक लोकांचा अनुभव घेतला असेल.. चेंगट , चिकट , माणूसघाणी अनेक लोक आपल्या अवतीभवती पहायला मिळतात.. सगळं असताना त्यांची ही अवस्था पाहिली की किव येते..
गेले ४ महिने ते आजारी आहेत .. त्यांना पहायला किवा भेटायला कोणीही गेलं नाही हे त्यांनी मला फोनवर बोलून दाखवलं .. ते बोलत असताना ऐकून मला वाईट वाटलं पण त्याचक्षणी मनात विचार आला कि , जेवढा पैसा जपला तितकीच माणसंही जपली असती तर ??.. कायम पैशाला कुरवाळत राहून , श्रीमंतीला कवटाळत बसून आता जाणवतय की आपल्याला कोणी पहायला आलं नाही.. त्यांना त्रास दुखण्याचा होत नाही तर कोणी भेटायला आलं नाही याचा जास्त त्रास होत आहे.. कारण मुलं सुना अजून पैसे कमावण्यात बिझी आणि बाहेरच्या माणसांवर कधीही प्रेम केलच नाही .. आणि आता वयाच्या ६५ मधे सगळं असून रोज रडायची वेळ त्यांच्यावर आली आहे.. पैसा हा गरजेनुसार कमवायलाच हवा.. पण कुठे थांबायचे हेही कळायला हवं.. आणि चांगली माणसे जोडून ठेवता यायलाच हवी.. आज त्यांच्याकडे पैशासोबत माणसे असती तर हॉस्पिटलमधे कोणी ना कोणी बसलं असतं.. आणि अधूनमधून कोणी ना कोणी फोन करुन चौकशी केली असती.. त्यांच्या ऑफीसमधल्या रिटायर लोकांनी त्यांच्याशी गप्पा मारायला फोन केला असता.. आता बरं नाही म्हणुन त्यांना या गोष्टीचा त्रास होतोय पण ते जेव्हा बरे होतील तेव्हा पुन्हा ते करोडोच्याच गोष्टी करणार हे सत्य आहे कारण आपण कधीही धडा घेत नाही.. आपण चुकतोय हे कळत असूनही स्वतःला बदलवत नाही.. त्यामुळे करोडो रुपये असून अशी रडायची वेळ येते…

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *