संभाव्य एस.टी.महामंडळाकडून १८% दरवाढीच्या प्रस्तावावर कंधारी आग्याबोंड

 

 

कंधारी आग्याबोंड गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ता.कंधार यांचे 

 

 

कंधारी आग्याबोंड

अनेक सवलतीने ग्रस्त परिवहन, महामंडळ सध्या तोट्यात आहे ! कंटाळून १८ टक्के भाववाढीस, एस.टी. महामंडळ अनुकूल आहे .

लालपरी महाराष्ट्राची आवडती, पण इंधन अन् टायर्ससह अनेक, बाबी महागल्याची दरवाढ आहे ! २०२१ वर्षी अंतिम दरवाढ होती, आमदाच्या वर्षी अनिवार्य आहे !

दरवाढीने नागरीक खिशाला कात्री, अवैध प्रवास आवडता होतो आहे ! सुरक्षित प्रवास महागडा झाल्याने, मानवी जीवनाचे मुल्य अमुल्य आहे !

प्रवाश्यांच्याच सेवेसाठी ही घोषणा, आता राज्याला बोचक वाटते आहे? आधीच महागाईने जनता परेशान, राज्यात एस.टी. भाववाढीचा निर्णय, शासनाच्या स्थापनेचे स्वागत आहे?

गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा, ता. कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *