कंधार ; प्रतिनिधी
ऐतिहासिक कंधार शहरातील भुतपूर्वी ऐश्वर्य संपन्न असलेल्या गांधी चौकात वाचकांची वाचनाची भूक भागविणारे,मला ग्रंथ वाचनाची आवड निर्माण करणारे विचार मंदिर वाचनालय कंधारचा सिंहाचा वाटा आहे.या उत्कृष्ट ग्रंथालयाची स्थापना हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात लढवय्य अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने “अ”दर्जाचे प्रसिद्ध असलेले विचार विकास मंदिर वाचनालय कंधार या ग्रंथवाचनालयात ये-जा करण्यासाठी असलेल्या पायऱ्याच्या पडदीवर ८ वटवृक्षाची रोपे उगवली होती.
पण जागे आभावी त्या रोपांच्या मुळ्यांना सुपीक जागा मिळत नसल्यामुळे रोपांची वाढ अगदी संथ गतीने वाढत होती.दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रंथालयाचे आदर्श ग्रंथपाल आदरणीय जगदीशजी धोंड सर यांच्या चर्चा करत असतांना माझी नजर त्या वटवृक्षाच्या रोपावर पडली.त्यावेळेस आदरणीय धोंड सरांच्या निदर्शनास या रोपांना आणून देताच,म्हणालो सर आपल्या पानभोसी येथील दररोज एक वृक्ष लावून त्या रोपास जगविण्याची दृढ इच्छाशक्ती असलेले वृक्षमित्र, वनरक्षक आदरणीय शिवसांबजी घोडके सरांना पाचारण करण्यात आले.त्यांनी आज १ डिसेंबर २०२४ रविवार रोजी दुपारी ३ वाजता येवून अगदी शिताफिने वृक्षमित्र आदरणीय शिवसांबजी घोडके सर यांनी अगदी मायेने,त्या रोपांना विनात्रास अलगद त्या ८ रोपांना जणू जीवदान दिले आहे.त्या ग्रंथालया शेजारी असलेले शेख मेकॅनिक यांच्या अवजाराचे अलगद काढून त्यांचे रोपन पानभोसी येथील श्री सिध्देश्वर माळ मंदिर परीसरात वृक्षारोपण करण्यासाठी आदरणीय घोडके साहेब यांनी सोबत घेऊन गेले.
या कार्या बद्दल आदरणीय शिवसांबजी घोडके सरांचे ही मोहिम यशस्वी केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार