ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा वळण रस्ता येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा वळण रस्ता येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर व सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर २६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.

यामध्ये चेंबूर येथील कारवाईत ५ व मुंब्रा येथील कारवाईमध्ये २ अशा एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून या दोन्ही कारवाईमध्ये एकूण ५४ लाख ४८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे ३५ लाख ७३ हजार ४०० व मुंब्रा येथे १८ लाख ७५ हजार २०० रूपयांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *