*कंधार प्रतिनीधी- संतोष कांबळे*
मागील तीन ते चार वर्षापासून मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून नावलौकिकास आलेली माजी सैनिक संघटना आगामी होणारी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्यामुळे मतदारसंघात अनेक पक्षांची डोकेदुखी ठरणार असे चित्र दिसत आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून माजी सैनिक संघटना लोहा-कंधार मतदार संघामध्ये सैनिकांचे प्रश्न सोडवत सामान्य जनतेचे पण प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
तालुक्यामध्ये अत्यावश्यक लाईट, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या बाबींवर कुठलाच विकास झालेला नसून एवढंच नव्हे तर ज्यांनी आजी-माजी खासदार आमदारांनी अनेक वर्षे सत्ता भोगली त्यांच्याच गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्यांना शिक्षण देता आले नाही त्यांना आरोग्य देता आले नाही हे कंधार तालुक्याचे दुर्दैव .
प्रस्थापित घराणेशाहीला मुक्त करून या तालुक्याचा विकास करून राज्यात लोहा-कंधार मतदारसंघाची आणखी वेगळी ओळख करण्याचा निर्धार केला आहे म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांचा उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोंबर रोजी दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी सैनिक संघटनेतर्फे अपक्ष उमेदवार बालाजी चुकलवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, लोहा कंधार मतदारसंघातील सुजाण मतदार देखील मोठ्या प्रमाणात अर्ज भरतेवेळी सोबत होते. आम्ही फक्त अर्ज भरला आहे बाकी शक्तिप्रदर्शन करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सातत्यानं जनतेसोबत उभे असतो आणि मला खात्री आहे की जनताही आम्हाला साथ देतील.” तसेच मी एक साधा कार्यकर्ता असून सर्वसामान्यांचं काम करण्यासाठीच लढतोय, असंही बालाजी चुकलवाड म्हणाले.
कंधार लोहा विधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी सैनिक संघटनेचे मार्गदर्शक सुभेदार मेजर माधव जायभाये, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे, माजी सैनिक संघटनेचे मुखेडचे तालुकाध्यक्ष भगवानराव नागरगोजे, उपाध्यक्ष मोरे पाटील, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन दादा कांबळे, सचिव पोचीराम वाघमारे,कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष संभाजी कल्याणकर,संघटक बापूराव कल्याणकर,सदस्य वडजे, रावसाहेब शिंदे, डिकळे सर, संजय जाधव , गणेश बेंद्रीकर,नारायण किरोळे,भासेवाड सर, मुसंडे सर ज्ञानेश्वर जायभाये,पाताळगंगा सरपंच प्रतिनिधी राजु मंडे तथा ग्रामपंचायत टीम माजी सरपंच रामप्रसाद चुकलवाड माजी सरपंच उद्धव किरतवाड माजी उपसरपंच बालाजी मुंडे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा मुंडे तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक तथा मतदार संघातील मोठ्या प्रमाणात युवा तरुण वर्ग ,गावकरी उपस्थित होते.