(लोहा ; दिगांबर वाघमारे )
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः/ती स्वतः किंवा त्याच्या/तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्यांला/तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यंत दोन्ही दिनांक धरून, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 88-लोहा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी, पुढील वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आलेली आहे.
तपासणी क्रमांक
प्रथम तपासणी – 08 नोव्हेंबर, 2024
व्दितीय तपासणी -12 नोव्हेंबर, 2024
तृतीय तपासणी -16 नोव्हेंबर, 2024
स्थळ
तहसील कार्यालय लोहा येथे सकाळी 10.00 ते 5.00
सदर तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब मा. खर्च निरीक्षक यांचेसमोर सादर करणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील, तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १० क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल, याची नोंद घ्यावी.
(अरुणा संगेवार)
निवडणूक निर्णय अधिकारी, 88- लोहा विधानसभा मतदार संघ
#विधानसभानिवडणूक२०२४