अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
प्रतिथयश लेखक श्री जे. आर. कोकंडाकर यांच्या ४ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज मंगळवार दि ०५ नोव्हेंबर २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मंगेश प्रकाशन, नागपूर,कोकंडाकर आणि मित्र परिवाराने केले आहे.
डॉ श्रीनिवास पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमास ह .भ. प. बा. ल. चोथवे आणि प्रोफेसर दुर्गेश रवंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री जे. आर. कोकंडाकर यांनी यापूर्वी विविध विषयांवर ४६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचं Prelude to the search of truth हे महात्मा गांधी वरील पाहीले पुस्तक 1994 साली प्रकाशित झालं.आज त्यांची ४ पुस्तके प्रकाशित होणार आहेत. अनुक्रमे ती अशी आहेत. एक : वेचलेली फुले व काटे, दोन : मानवा , सुज्ञ हो ( भाग एक) , तीन : Men’s Real Growth, आणि चार : Men, be sane . या चार पैकी शेवटची दोन पुस्तकं इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत. म्हणजे आज त्यांचे ५० वे पुस्तक प्रकाशित होत आहे. या अर्धशतकी दमदार वाटचालीतील हा मैलाचा दगड आणि मोलाचा प्रकाशन सोहळा असणार आहे.
सायंकाळी ०५ : ३० ते ०७ : ३० वाजेपर्यंत, गिरीराज मंगल कार्यालय, अंबिका मंगल कार्यालयाच्या शेजारी, रिंग रोड, छत्रपती चौक, नांदेड येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास
उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, कोकंडाकर आणि मित्र परिवाराने केले आहे.