राज्यस्तरीय शालेय बेसबॉल #क्रीडा स्पर्धा संपन्न …! पुणे,मुंबई,कोल्हापूर, अमरावती संघास अजिंक्यपद

 

#नांदेड , दिनांक,८ नोव्हेंबर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयं नांदेड,जिल्हा क्रीडा परीषद नांदेड यांच्या संयुक्तं विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली #बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुलींच्या गटात प्रथम पुणे,द्वितीय मुंबई तर अमरावती तृतीय स्थानावर राहिले तर मुलाच्या गटात प्रथम पुणे, द्वितीय कोल्हापूर,तृतीय अमरावती संघाने स्थान संपादन केले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते पार पडला .यावेळी उपस्थित क्रीडा मार्गदर्शक प्रकाश होनवडजकर,क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, शिवकाता देशमुख,अकोला जिल्हा सचिव नारायण बत्तुले, अमरावतीचे इंद्रजित नितनवार,ज्ञानेश काळे, चाळीसगाव चे देशमुख सर,राजेंद्र बनसोडे,संदीप लंबे,विपुल दापके, हौशी बेसबॉल जिल्हा संघटना नांदेड चे सचिव आनंदा कांबळे,सोमनाथ नरवडे निवड समिती सदस्य प्रदीप पाटील, वैष्णवी कासार,आदी मान्यवर उपस्थीत होतें.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवर यांनी केले व आभार प्रदर्शन बालाजी शिरसिकर यांनी केले.

अंतिम सामन्यामध्ये शिवराज शेरकर,ओम आडसुळे, आस्मी राऊत,शर्वरी देवकर (पुणे),केदार गायकवाड,समर्थ जाधव (कोल्हापूर),रियोना मेहता,काव्या कोठारी(मुंबई)या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत आपल्या संघाना विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. विजय संघाना क्रीडा कार्यालयामार्फत चषक , प्रमाणपत्र व पदक देण्यात आले.

अंतिम सामन्यात पंच प्रमुख गणेश बेटूदे,सोमनाथ सपकाळ,संतोष आवचार, मुकेश बिराजदार,बालाजी गाडेकर, आकाश साबणे,विशाल कदम,राहुल खुडे,सायमा बागवान,यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून गौस शेख, सोपान केदार,अर्चना कोल्होड,अमृता शेळके, इत्यादींनी म्हणून भूमिका निभावली.

स्पर्धा पार पाडण्यासाठी संतोष कणकावार वरिष्ठ लिपिक, संजय चव्हाण,आनंद जोंधळे, दत्तकुमार दुथडे ,मोहन पवार, विजयानंद भालेराव,यश कांबळे,सुभाष धोंगडे, आकाश भोरे ,शेख अक्रम, चंदू गव्हाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी,जिल्हा बेसबॉल संघटना आदींनी परिश्रम घेतले.

उपांत्य सामन्यांचे निकाल
मुले विभाग
1) कोल्हापूर वि. वी लातूर (15-0) होमरन
2) पुणे वि. वी अमरावती (8-0) होमरन
मुली विभाग
1) मुंबई वि.वी (7-5) होमरन
2) अमरावती वि. वी नागपूर (06-4) होमरन

अंतिम सामन्याचे निकाल
मुली विभाग
पुणे वि.वी मुंबई (11-1) होमरन
मुले विभाग
पुणे वि.वी कोल्हापूर (10-0) होमरन
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *