अहमदपूर : शनिवार दि 02 नोव्हें 24 रोजी कार्तिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात संबंध महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून पदयात्रा मांजरसुंभा,कपिलधारला निघतात. कार्तिक पौर्णिमेला ( या वर्षी ती 15 नोव्हें 24 रोजी आहे. ) या सर्व पदयात्रा संतशिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी देवस्थान मांजरसुंभा , कपिलधारला पोहचतात. कपिलधार समस्त लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहे. गुरुराज माऊली, मन्मथ माऊली या जयघोषात कपिलधारला जाणाऱ्या पदयात्रा हे समाजाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे.
दरम्यान आज दि 10 नोव्हें 24 रोजी बिचकुंदा, तेलंगणा राज्य येथून कपिलधारला जाणाऱ्या पदयात्रेकरुनी येथील भक्ती स्थळावर राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजिवन समाधीचे दर्शन घेतले. ते मिशन कल्हाळी, मंडल बिचकुंदा , जिल्हा कामारेड्डी ,तेलंगणा राज्य येथून शि भ प 108 सोमलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलधारला जाणाऱ्या पदयात्रेत परळी वै येथून आज दि 10 आक्टों 24 रोजी सहभागी झाले आहेत. पदयात्रेत सहभागी होण्याचं हे त्यांचे 09 वे वर्षं आहे. भक्ती स्थळावर राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दर्शनानंतर अमोल माली पाटील , बस्वराज मुक्कनवार, सुंदर शरणाप्पा, हांडे शरणाप्पा, मुक्कनवार मंजू आणि प्रा भगवान आमलापुरे यांचा काढलेला एक फोटो. फोटो क्लिक : अर्णव किरण पाटील,तमलुर शेळगाव.