कंधार ; प्रतिनिधी
छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूल कंधार येथे सायंकाळी 8.00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करून प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी शेकापच्या उमेदवार आशाबाई शिंदे यांना जाहिर पाठिंबा दिला.
मागच्या अनेक वर्षा पासुन कंधार लोहा तालुक्यात सामजिक कार्याच्या माध्यमातून सेवा करताना कोरोना काळापासून भाऊचा डब्बा आसेल किंवा सहा हजार व्ययोवर्धाचा डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करून अंधमुक्तीचा संकल्प असे अनेक सामजिक कार्याच्या माध्यमातून व मराठा आंदोलकाचे मनोज जरांगे
पाटलांच्या सूचनेनुसार 2024 व्या विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला परंतू शेवटी दादांच्या सुचनेनुसार मी उमेदवारी अर्ज परत घेतला.
पूढे मी तठस्थ राहू शकलो असतो पण माझ्या कार्यकत्यांच काय ? हा प्रश्न माझ्यापूढे होता. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाच्या सर्व कार्यकर्त्यांची व सर्च समाज बांधवांची बैठक घेवून त्यांच मत जाणून घेवून ज्या पक्षात माझे बाबा डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांची उभी हयात गेली. ज्या पक्षाचा कंधार- लोहा तालुका बालेकिल्ला होता आजही त्याच पक्षाचा होंडा माझ्या घरावर, गाडीवर डौलाने फडकतो याचा मला अभिमान आहे. माझ्या बाबानंतर माझ्यासाठी पीतृतुल्य असलेले माझे काका गुरुनाथरावजी कुरूडे यांना आज जेंव्हा मी भेटलो त्यावेळी त्यांनी मला स्पष्ट शब्दात आपल्या धोडगे साहेबांचा पक्ष शे. का.पक्ष आहे. त्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवतोय त्यांच्या सोबत राहणे आपले कर्तव्य आहे. मी आयुष्यभर शे. का. पक्षाचाच होतो आणि आजही आहे. तू सुध्दा शे. का. पक्षाचेच काम केले पाहीजे असा सल्ला दिला त्यामुळे त्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. आशाबाई श्यामसूदंर शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला व भविष्यात मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न विधानसमेत सक्षमपणे मांडण्याची भुमीका घेण्यासंदभांत व येणाऱ्या जि. प. पंचायत समिती, नगर परिषद निवडणूकी संदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा करूनचं सर्व कार्यकर्त्यांचा मतानुसार मी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांना जाहिर पाठींबा देत आहे. यापूढे मी, माझे सर्व कार्यकर्ते व सहकारी यांची जेवढी कुवत असेल, तेवढी ईमान इतबारे जनता जनार्दन मायबापाच्या आशीर्वादाने सक्षमपणे सौ. आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांचा विजय होण्यासाठी त्यांच्या शिट्टी या निशाणीला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेद्वारे केले.
यावेळी त्यांच्या सोबत मन्नान चौधरी माजी उपाध्यक्ष न. पा. कंधार,महमद जफोरूल्ला खान माजी उपाध्यक्ष न. पा. कंधार,दगडु भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष न. पा. कंधार,रब्बानी चाऊस माजी नगरसेवक न. पा. कंधार
,राम बनसोडे माजी नगरसेवक न. पा. कंधार,
अरुण पोतदार माजी नगरसेवक न. पा. कंधार
,महेमुद पठाण – जनतादल सेकुल्यर जिल्हा अध्यक्ष,
राजू भाऊ सोनकांबळे – समाजिक कार्यकर्ता,
सुरेशसिंग लाला -कॉग्रेस कार्यकर्ता
,आलिम भाई माजी नगरसेवक न. पा.,अहेमद चौधरी युवा नेता,सरफोदिन आजमोदिन माजी नगरसेवक लोहा,एजाज पटेल सामाजिक कार्यकर्ता
,शेख जावेद सामाजिक कार्यकर्ता,बबनराव निर्मेले- नगरसेवक लोहा न. पा,बालाजी खिलारे नगरसेवक लोहा,
पांडूरंग दाढेल सामाजिक कार्यकर्ता, सुधाकर सातपुते संचालक खरेदी विक्री संघ लोहा,सिध्देश्वर वडजे समन्वय सदस्य,फयाजभाई शेख शे. का. प. तालूका अध्यक्ष अल्पसंख्याक लोहा. आदी कार्यकर्त्यांनी यावेळी पाठिंबा जाहीर केला. यावेळी नवनाथ बनसोडे, महेश पिनाटे, ज्ञानेश्वर चोंडे, बाळू मंगनाळे, शेख शेरुभाई, कैलास वूभूते, राम गोरे, वसंत मंगनाळे, येजाज भोसीकर, सदाम कांधरी, गिरीश मामडे, आदी शेकाप चे कार्यकर्ते उपस्थीत होतें.