निकाल

 

कुठलीही परीक्षा दिल्यानंतर सर्वात जास्त उत्सुकता ही त्याच्या निकालाबाबत असते अगदी याच प्रमाणे नांदेडमध्ये २५ वर्षानंतर एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेसाठीचे मतदान नुकतेच पार पडले, चुरशीच्या लढतीत कोण ठरणार किंग? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. निवडणुक कोणतीही असो त्यात अनेकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसून येते. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भातील तोफा निकालापर्यंत थंडावल्या जाणार नाहीत.

दिनांक २० नोव्हेंबर २०१४ वार बुधवार रोजी मतदानाची प्रक्रिया ही सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत सुरू राहते ह्या संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पुर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा तयारीनिशी सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे दिली जाते.
कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आलेला असतो. अशी एकूण तयारी प्रशासनाने दाखवलेली असते. यादरम्यान मतदान प्रक्रिया पार पाडलेली असली तरी यात आपली प्रतिष्ठा कोण? राखणार हे ठरवलेल्या तारखेनुसार मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्या दिवसाकडे राहणार आहे.
जिल्ह्यात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, हदगाव, किनवट, लोहा, नायगाव, मुखेड आणि देगलूर असे नऊ विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. लोकसभा मतदार क्षेत्रात लोहा, हदगाव आणि किनवट वगळता इतर सहा तालुक्यांचा समावेश आहे.

खासदार यांच्या अकाली निधनाने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर केली. यामुळे ९ विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान
नांदेडमध्ये दिग्गज नेत्यांच्या राज्य पातळीवरील सभा झाल्या. या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीनंतर लोकांनी दिलेल्या मतांचा काय निकाल लागतो यावर सर्वजनता लक्ष ठेवून असते. कारण असे की, निवडणुकीचा निकाल हा राजकीय स्थैर्य, ठरलेल्या धोरणातील सातत्य आणि गुंतवणूकदारांच्या भावना यासारख्या घटकांवर प्रभाव पाडणारा असतो. त्यामुळेच निवडणुकीपुर्वी जनमताचे वारे कसे वाहत आहेत याचा शास्त्रशुदध अभ्यास किंवा भाकीत दृष्टीने काढलेला परिणामामुळे किंवा सध्याच्या बाजारातील अस्थिरतेचे श्रेय निवडणुकीच्या निकालाबाबत विविध असंतोषजनक बातम्या आणि अपडेट्स दिले जात असल्याने कदाचित वातावरणात तणाव निर्माण होऊ शकते. परंतु ‘राजकारणात कधीही कोणी संपत नसतं’ हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं निरीक्षण आहे. संपण्याच्या, वा संपवण्याच्या, वल्गना कायम विरोधी बाजूंनी एकमेकांवर केल्या जात असल्या तरीही, काही निवडणुका या कारकीर्दी, घडवणा-या वा बिघडवणा-या असतात. त्यांच्या निकालांचा परिणाम पुढचा काही काळ या कारकीर्दींचंजे राजकारण असतं, त्याला एक तर उंचीवर नेऊन ठेवणारा असतो किंवा अगदी काही काळ मागे नेणारा. त्या निकालानं काहींची कारकीर्द झळाळून निघते, तर काहींची कारकीर्द झाकाळते. शिखरावरचा असो वा पायथ्याचा, तो काळ किती लांबीचा असेल, यांचे कोणालाही भाकित वर्तवता येणं कठीण. त्यासाठीच त्यांचा राजकीय कारकीर्दीतला आजवरचा सर्वांत महत्वाचा निर्णय या निवडणुकीत पणाला लागलेला असतो. त्यामुळे सर्वत्र या निकालाची आतुरतेने प्रतिक्षा करताना दिसतात.
अश्या वेळी आपल्या सारख्या जनसामान्यांनी येणाऱ्या निकालाचा स्वीकार करून त्याचे स्वागत करायला पाहिजे.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *