वृंदावन मथुरा यात्रेत सगळ्यात आवडलेली जागा.. ही जागा वृंदावन मधेच आहे.. मला या जागेबद्द्ल आधी काहीही माहीत नव्हतं.. जेव्हा मी तिथे गेले आणि तो परिसर पाहिला आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली.. प्रचंड प्रमाणात झाडी असलेले हे ठिकाण.. न्याहाळत असताना त्या झाडान्मधे वेगळेपणा जाणवला . वेगळेपणा म्हणजे तेथील प्रत्येक झाड एकमेकाला बिलगलेलं आहे.. जणू काय एकाने दुसऱ्याला घट्ट मिठी मारली आहे.. अगदी राधा कृष्ण सारखे एकरुप.. त्या गाइडला त्या बद्दल विचारलं.. तेव्हा तो म्हणाला , वृंदावन मधील प्रत्येक गोष्ट किवा वस्तु हे राधाकृष्ण चं प्रतिक आहे.. या झाडातही ते दोघे आहेत .. तुम्ही हात लावून दर्शन घेउ शकता.. नास्तिक व्यक्ती कदाचित यावर विश्वास ठेवणार नाही पण जेव्हा आपण तिथल्या वाईव्ज अनुभवतो ना तेव्हा जाणवतं की इथली प्रत्येक वस्तु ही दैवी आहे.. त्यात युनीकनेस आहे.. तिथे राधाराणी स्वतः वास करतेय पण आपल्या डोळ्यांनी आपण डायरेक्ट त्यांना पाहू शकत नाही..
आत जाऊन राधाराणीचं दर्शन घेतलं.. आणि पुढे चालायला लागलो तेव्हा गाईड म्हणाला , ही जागा रोज संध्याकाळी ६ वाजता बंद होते आणि बंद करताना इथे एका ताटात शृंगार म्हणजे हळदकुंकु , बांगड्या आणि त्याचसोबत एका वाटीत दुध , एक लाडु . विडा असं सगळं ठेवलं जातं.. आणि सकाळी मंदिर उघडल्यावर तुम्ही पहाल तर त्यातील शृंगार विस्कटलेला असतो.. लाडु थोडा खाल्लेला असतो.. पानही खाल्लेलं असतं.. म्हणजेच काय तर आजही राधाराणी , गोपी , कृष्ण हे तिथे येउन रासलिला करतात.. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी तिथे लपून राहून पहायचा प्रयत्न केला तर त्यातील कोणी वेडा होवून बाहेर आला.. कोणी आंधळा झाला .. मग मिडीयाने कॅमेरे लावून ठेवले तर कॅमेऱ्यात फक्त प्रकाश दिसला बाकी काहीही नाही पण त्याच्या आजूबाजूला रहाणारी मंडळी आजही सांगतात की रोज रात्री घुंगरांचा आवाज येतो.. हे सगळं अद्भुत आहे.. खरच असेल का ??.. अशी शंका नक्कीच येउ शकते .. अंधश्रद्धा वाले म्हणतील असं काही सांगू नका .. मी जे ऐकले आणि पाहून आले तेच सांगतेय कारण भाव असेल तर आणि तरच या गोष्टी पटु शकतात.. कधीकधी अतिरेकही वाटतो कारण आपण असा अनुभव आपण घेतलेला नसतो.. पण ती जागा भारावून टाकणारी होती हे मात्र निश्चित.. वृंदावन मधे ५००० मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची वेगळी खासियत आहे.. तिथेच जवळ असलेले पुरातन नृसिंह मंदिर सुध्दा सुंदर आहे..
तुम्हाला राधाराणीने कधी बोलावलं तर या प्लेसला नक्की जाऊन या आणि स्वतः अनुभव घ्या.. तिच्या इच्छेशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही हे मात्र खरं..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist