डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे संविधान दिन साजरा….

 

कंधार :

येथील पालिका प्रशासक तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या आदेशाने नगरपरिषदचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार सह ग्रंथपाल व वाचनालयाचे अविरत वाचक बुरफुले हरी, उद्धवराव सर, शेख फारुख भाई, यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेसहीत असलेल्या संविधान फलकास पुष्पहार अर्पण केले. तसेच उपस्थित वाचकांनीही पुष्प अर्पण केले. यानंतर मोहम्मद रफीक सत्तार सह ग्रंथपाल यांनी संविधान दिवसाबद्दल उपस्थित वाचकांना माहिती दिली. त्यानंतर उपस्थित वाचक व कर्मचारी यांनी सामूहिक रित्या संविधान प्रस्ताविकीचे वाचन करण्यात आले. यावेळी कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, कमलबाई जाधव, वंदना फुले आणि मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *