कंधार : प्रतिनिधी
नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजाने महायुती सरकारच्या बाजूने एकजुटीने मतदान केल्यामुळे महायुतीचा विजय निश्चीत झाला आहे, या निवडणुकीत महाराष्ट्रातील बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने मतदान केल्याबद्दल, भाजपा नांदेड उपजिल्हा अध्यक्ष तथा तांडा समृद्धी योजनेचे जिल्हा स्तरीय अशासकीय सदस्य भगवान राठोड यांनी जाहीर आभार मानले आहे9.ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागा मार्फत निर्माण केलेल्या “संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या” माध्यमातून तालुका स्तरा पर्यंत अशासकीय सदस्यांना कामाला लावण्याचे काम आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी केले, तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यांनी तांड्या तांड्यात केलेल्या कामाचा फायदा या महाविजयात झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तांड्यावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने बंजारा समाजाने मतदान केले आहे. महाराष्ट्रातील बंजारा संतांनी तांड्यातांड्यावर प्रवास करून समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न केला आहे. पोहरादेवीचा विकास असेल किंवा राज्य शासनाने बंजारा समाजासाठी केलेल्या अनेक योजनेच्या घोषणा असतील यावर बंजारा समाजानी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे, येणाऱ्या काळात बंजारा समाजाचा विकास फक्त महायुतीचं सरकार आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच करू शकतात हा विश्वास बंजारा समाजाने दाखवलेला नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागेवर जिल्ह्यातील तमाम ७५० तांड्यावरील बंजारा समाजाने महायुतीच्या बाजूने मतदान केले आहे.
त्यामुळे बंजारा समाजाला सरकारमध्ये उचित स्थान देऊन सन्मान करावा, अशी मागणी बंजारा समाजातून होत आहे.
नांदेड जिल्ह्यातून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्री करून बंजारा समाजांला उचित स्थान द्यावे, अशी मागणी बंजारा समाजातून होत आहे, या पुढे सरकार बंजारा समाजाच्या प्रश्नावर काम करून समाजाला न्याय देण्याचे कर्तव्य आता पुर्ण करावे, महायुतीच्या सरकारने “बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचा” विकास समाजा साठी आणलेली तांडा समृद्धी योजना यासह बंजारा समाजासाठी विविध योजना राज्य शासनाने आणलेल्या आहेत, याचा फायदा महायुती सरकारला झालेला आहे.प्रत्येक तांड्यावरील बंजारा समाजाने एकतर्फी कौल देऊन महायुतीचा विजय सुखकर केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने बंजारा तांड्याचा विकास केला पाहिजे ही आग्रही मागणी असणार आहे,सरकारने घोषित केलेल्या सर्व योजना बंजारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सरकारने प्रयत्न करावे, ज्या ज्या योजना सरकारने घोषित केलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ बंजारा समाजाला व्हावा, यासाठी सर्व बंजारा समाज आग्रही राहणार आहे.
बंजारा समाजाच्या तांड्याचा विकास करावा,आज बंजारा समाज भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे,भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने व महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाने बंजारा समाजाला सरकारमध्ये उचित स्थान देऊन बंजारा समाजाचा सन्मान करावा, ही आग्रहाची मागणी समाजाच्या वतीने राहणार आहे. गावापासून कोसो दूर तांड्यावर असणाऱ्या समाजाला तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून विकास करून, बंजारा समाजाला तांड्यावर रोजगार निर्मिती साठी उद्योग उभारावे, रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या समाजाला स्थिरता द्यावी, अशी मागणी बंजारा समाजाची सरकारकडे राहणार आहे.
आम्ही समाजाच्या वतीने आमचं काम केलं! सरकारने आता सरकारचं काम करावं! सरकार या समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, नक्कीच न्याय देईल असा विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड यांनी व्यक्त केला आहे.