निवडणुकीची रणधुमाळी ओसरताच,बोचर्‍या थंडीच्या गारठ्याची लाट मन्याड खोर्‍यात उसळली!

कंधार ; प्रतिनिधी 
नुकतेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काल २० नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार मतदार राजांनी ईव्हीएमवर बजावला.दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागलेल्या निकालाने रणधुमाळी थंडावली आहे.कार्तिक मास संपण्याच्या उंबरठ्यावर आहे.यंदा पाऊसकाळ जास्त काळापर्यंत बरसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला.त्यातच निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला होता.चोहुबाजूंनी सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवार आपापला प्राचार रथ कर्णकर्कश आवाजाने मतदार राजा पूर्ता वैतागून गेला होता.मतदानाची खरेदी-विक्री दिनरात होतांना “आळी मिळी गुपचिळी”या उक्तीसम सर्वाची बोलती बंद झाली होती?पण सध्या हिवाळ्याचा ऋतू मध्यावर असल्याने बोचरी थंडीचा कडाका मन्याड खोर्‍यात वाढतांना दिसतो आहे कंधार शहरातील स्वामी विवेकानंद व भगवान बाबा चौकात असलेल्या दिवसभर मेकॅनिकचे काम करुन थकलेले, वाढत्या थंडीच्या प्रतिकार करण्यासाठी तरुणाई शेकोटीचा उपयोग सायंकाळी घेत असतांना माझ्या मोबाईलवर हे दृश्य टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *