सामाजिक एकात्मतेवर सर्वांनी भर दिला पाहिजे.राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचे असते.सामाजिक एकात्मता व शिक्षणावरच त्या काळात त्यांनी जास्तीत जास्त भर दिला. त्यांनी अगोदर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाजाला दशेतून दिशेकडे नेण्याचे महान कार्य त्यांनी त्या काळात केलेले आहे.म्हणून सामाजिक समानतेचा विकास पुरुष असे ही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सामाजिक कार्यामुळे त्यांचे नाव अजरामर झाले आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे ज्ञानदीप या उपाधीनेही ते शोभून दिसतात. आरोग्याच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे.त्यामुळे त्यांना समाज बांधवांनी मुंबई येथे महात्मा ही पदवी दिली. आजच्या तरुणांनी त्यांचे विचार, कार्य, संघर्ष या गोष्टीकडे लक्ष दिल्यास सामाजिक बांधिलकीतून योग्य होईल. त्यांचे विचार नेहमी प्रेरणादायी होते. अनेक जण त्यांचे विचार,कार्य भाषणातून सांगतात. परंतु त्यांना भारतरत्न हा नागरी पुरस्कार आजतागायत सरकारने दिलेला नाही.या विषयावर थोडी चर्चा होते. आणि ती नंतर हवेत विरून जाते. त्याचे काय?
ज्या व्यक्तीने आयुष्यभर शिक्षणाची गंगोत्री घरोघरी पोहोचावी, म्हणून विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गति विना वित्त गेले. वित्ता विना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
अशा शब्दात शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली म्हणून त्यांना आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ असे म्हटले जाते.ज्या काळा मध्ये माणसाला माणुसकी शिकवली जात नव्हती. इंग्रजांचे राज्य या देशावर दीडशे वर्षे होते. त्यांनी असमानतेची वागणूक दिली,’फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला होता. त्याकाळी आपल्याच येथील बुद्धिमान विचारवंतांनी शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वडीला संगे वाद निर्माण झाल्यानंतर बाजूला राहून 1848 रोजी पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून आद्य शिक्षणाचे प्रणेते बनले. त्यासाठीच हा लेखन प्रपंच ….अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस असे काव्य ऐकायला कानाला गोड वाटतात. परंतु माणसाला माणूस म्हणून शिकवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आजीवन समाजाची अंत:करणातून सेवा केली. बहुजन समाजातील मुले शिकावेत ?मोठे व्हावेत ? दोघे पती-पत्नी दिसायला दोन जरी असले तरी एका मनाने विचाराने त्यांनी समाजाची, शिक्षण व्यवस्थेची आणि या देशाची सेवा केली. हे करीत असताना त्यांनी कसलाच भेदभाव केला नाही.विधवा स्त्रियांना त्रास देणाऱ्या लोकांना जागेवर आणण्यासाठी बहुमोलाचे कार्य हाती घेतले. नाभिक लोकांचा संप घडून आणला.त्या लोकांनी परत आम्ही केस कापणार नाही याची ग्वाही दिली. त्या काळातील या घटना म्हणजे अतिशय क्रांतिकारक बदल करणाऱ्या होत्या.निर्भीडपणाने ठणकावून त्यांनी ब्रिटिशांनी सांगितलं. व येथील टवाळखोराची कानउघाडणी करून समज दिली महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य थोडक्या शब्दांमध्ये किंवा एक लेख लिहून पूर्ण होत नाही. एखाद्या मुलीचा चुकून वाकडा पाऊल पडला असेल तर स्वतःच्या घरामध्ये त्यांनी त्या मुलीला बोलावून घेऊन काळजी घेतली. म्हणून त्यांना मानवतेचे पुजारी असे ही म्हणतात.
आजची परिस्थिती पाहिली तर कोण कोणासाठी एवढं करत आहे.दलित समाजासाठी त्यांनी पिण्याच्या पाण्याचा हौद रिकामा करून दिला.
हे काय लहान गोष्ट आहे काय ?
आज आपण पाहतो? जिकडे तिकडे कोण कोणासाठी वेळ द्यायला सुद्धा तयार नाही? जे मुलं शाळेत येत नाहीत, त्यांना एक रुपया दंड लावावा असे त्यांनी हंटर कमिशन पुढे स्पष्ट सांगितले.प्राथमिक शिक्षण मोफत दिले पाहिजे. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे.
जो शिकतो तो कोणाच्याही पुढे नतमस्तक होणार नाही .
असे त्यांचे स्पष्ट मत होते. येथील कामगारांना छळणारे अनेक लोक होते.म्हणून त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. तृतीय रत्न नाटक लिहून शेतकऱ्यांची ब्रिटिश लोक कशी फसवणूक करतात याची रंगीत तालीम प्रत्यक्षात करून दाखवली. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून शेतकऱ्यांची सद्यस्थिती काय असते? आणि त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे त्यांनी त्या पुस्तकातून सांगितले. ब्राह्मणांचे कसब या पुस्तकातून सर्वसामान्य भोळ्या बापड्या लोकांना अंधश्रद्धा कशा निर्माण करतात हे दाखवून दिले स्त्री- पुरुष समान आहेत. असे सांगितले.1873 मध्ये सत्यशोधक समाजाची निर्मिती करून समाजातील अंधश्रद्धा दूर केल्या. त्यांनी सृष्टीतील निर्मात्याला महत्त्व दिले. वर्णव्यवस्था सगळी फेटाळून लावली. पुरुष आणि महिला हे दोन जाती आहेत.
हे त्यांनी मान्य केले.हा एवढा मोठा विद्वान आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला की फार मोठी गोष्ट आहे.म्हणून त्यांचे स्मरण करणे.आपले आद्य कर्तव्य आहे. इंग्रजांच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या सुधारणा करणे. अशिक्षित समाजाला समजून सांगणे.
ही गोष्ट म्हणावी तशी साधी व सोपी नाही. आपण आज लेख लिहून समाजामध्ये जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु त्यांनी वाचावीर न होता कृतीवीर होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्व समाजाला आणले म्हणूनच त्यांना लोकांनी स्फुर्तपणे महात्मा ही पदवी मुंबई येथे दिली .म्हणून आपण सर्वांनी अशा या महात्म्याचे गुणगान करावे. त्यांच्या कार्याचा विसर पडू देऊ नये. समाजातील अनिष्ट रूढी ,प्रथा परंपरा,याची उच्चाटन करावे. सर्व मुलांना शाळेत पाठवावे. अंधश्रद्धा बाळगू नयेत.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली ही गोष्ट अतिशय स्फूर्तीदायी आहे .महात्मा फुलेंचे कार्य आज अनेक वर्षानंतर सुद्धा जशाला तसे पुढे चालत आहे. महात्मा फुले सारखे व्यक्ती होणे आता अशक्यप्राय अशी गोष्ट झाली आहे. सध्या एका घरातील माणसे एकमेकांचे ऐकत नाहीत त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने त्यांची स्तुती केलेली आहे. एवढे महान व्यक्तिमत्व म्हणजेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. आज घरोघरी त्यांचे नाव घेतले जाते. स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिकून समाज परिवर्तन केले. सावित्रीबाई फुले या शाळेला जाते वेळेस त्यांच्या अंगावर चिखल, माती, शेण फेकण्याचे धाडस दुष्ट लोकांनी केले .त्यावेळेस क्रांती गुरु लहुजी साळवे ( वस्ताद ) समाज कंटकांना वठणीवर आणले आजची परिस्थिती पाहता महात्मा फुले यांच्यासारखे कार्य करणे समाजाशी एकरूप होणे. मी समाजाचा आणि समाज माझा ही मनाशी खूणगाठ बांधणे. आता तर शक्य नाही. हेच कार्य समाजातील बुद्धिजीवी व होतकरू वर्गाने सदैव चालू ठेवावे. सत्यशोधक समाजाच्या रितीरिवाजा नुसार विवाह व्हावेत, त्यांचा दत्तक मुलगा यशवंत आणि राधा यांचा आंतरजातीय पहिला विवाह लावून दिला.आयुष्यभर पती-पत्नीने समाजासाठी अहोरात्र श्रम केले. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना जास्तीत जास्त थकवा जाणवत होता. या मधूनच मुंबई येथे 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पवित्र स्मृतीस विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड यांच्या वतीने विनम्र अभिवादन.*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड