कंधार ; प्रतिनिधी
नांदेड लोकसभा मतदार संघाचे नूतन खासदार प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांच्या निवडीबद्दल नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर यांच्या वतीने दि .३० रोजी नायगाव येथे निवासस्थानी भेट देऊन सत्कार करण्यात आला .
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.
प्रा. रविंद्र पाटील यांनी नुकतीच खासदार म्हणून शपथ घेतली .जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर यांच्या वतीने दि .३० रोजी नायगाव येथे निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव आप्पा बेळगे, शरद पाटील तेलंग, वसंतराव पाटील घोरबांड आदीसह कॉग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .