नांदेड / राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिकक्षेत्तर कर्मचारी अधिकारी यांचे रजा रोखी करण , उपदान , अंशदान , पदोन्नतीचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रकर्षाने पाठपुरावा केला पण कांही प्रश्नअद्याप सुटलेले नाहीत ते प्रलंबीत प्रश्न सोडवण्या साठी राज्यशासना विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रतिपादन शानिवार दि .३० नोव्हेंबर रोजी स्कॉऊट गाईड कार्यालयात आयोजित सहविचार सभेत महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष जी . आर . घाटूळ यांनी केले .
या सहविचार सभेच्या अध्यक्षपदी जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड होत्या . प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव धाईजे , राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे ,राज्य समन्वयक विठ्ठलराव ताकबीडे, राज्य संघटक ,बादाडे टी . एल . बीड जिल्हाध्यक्ष करंडे एच . पी .परभणी जिल्हाध्यक्ष एम .के . कादरी , नांदेड जिल्हा पदाधिकारी रमेश गोवंदे , मदन नाईके ‘ प्रभाकर कमटलवार , जाधव एस . पी . यांची प्रमुख उपस्थिती होती . प्रथम अध्यक्ष , प्रमुख अतिथी यांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
पुढे बोलतांना घाटूळ म्हणाले संघटना ही आई सारखी असते ती सर्वानां समान न्याय देते म्हणून अल्पावधित अस्तित्वात आलेल्या या संघटनेमुळे सेवानिवृतांना प्रशासनात प्रतिष्ठा मिळत असल्याने संघशक्तीच्या बळावर सर्वांचे प्रश्र तडीस लावण्या साठी सर्वांनी अजिव सभासद होण्याचे आवाहन केले . अध्यक्षीय समारोपात जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड म्हणाल्या जिल्ह्यातील तमाम सभासदानी संघटणेशी एकनिष्ठ राहून वेगवेळे लढे उभारले या पुढेही एकीचे बळ देण्याचे आवाहन करून वरिष्ठाच्या मागदर्शनात कामकरणार असल्याचे सांगितले .
सभेचे प्रास्ताविक राज्य संघटक बालाजी डफडे यांनी केले ,सुत्रसंचालन शेख मैनोद्यीन तर आभार प्रदर्शन शेख रियाजोद्यीन यांनी मानले .
यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सेवानिवृत्त यांची उपस्थिती होती बैठक यशस्वी करण्यासाठी ए. एन . आमंतवाड ,बी .एस . सरोदे ,सुरेश मुपडे , सौ . सुलोचना पेठकर , धोंडीराम गुंटुरे , शिवधन राठोड , गंगाधर मावले ,शिवाजी जाधव ,गायकवाड नामदेवराव , गंगाधर देशमुख यांनी परिश्रम घेतले .