वर्ताळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत कृतज्ञता सोहळा संपन्न …! शाळेसाठी दिला माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट टीव्ही भेट

मुखेड:( दादाराव आगलावे)

येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ताळा येथे ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा झाला त्या शाळेप्रती उतराई म्हणून शिकून गेलेल्या व सध्या विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी व व्यावसायिक बांधवांनी शाळेला स्मार्ट टीव्ही, सर्व इयत्तांच्या अभ्यासक्रमाचा पेनड्राईव, वाचनासाठी नानाविध पुस्तके, स्वाध्यायपुस्तिका साहित्य भेट देऊन इतर शाळेतील माजी विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये या दृष्टिकोनातून गावातील ४४ कर्मचारी बांधवांनी ४९ हजार १५८ रुपये निधीचे संकलन केले. यातून वरील साहित्य भेट दिले. यावेळी राजेंद्र केरुरे वर्ताळकर, भारत जायेभाये, किशनराव आगलावे, बळवंत डावकरे, चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हणमंत जायेभाये यांनी स्वाध्यायपुस्तिकांविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आचमारे यांनी तर संचलन शिंदे यांनी केले. यावेळी मोतीराम डावकरे, विश्वांभर जायेभाये, आनंद आगलावे, रवी जायेभाये, रमेश डावकरे, भास्कर आगलावे इकबाल शेख, अशोक सुर्वे, संतोष जायभाये, धम्मदीप वाघमारे, गणेश जायभाये, किशन आगलावे, ईश्वर आगलावे, पंढरी आगलावे, गणपत गायकवाड, विष्णू आगलावे, माधव गायकवाड, संदीप गायकवाड, प्रस्तुत शाळेचे सहशिक्षक आंदुरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बळवंत डावकरे, रमेश डावकरे प्रभाकर डावकरे, आनंद आगलावे यांनी विशेष पुढाकार घेतला. सदरील ऋणनिर्देश कार्यक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *