कंधार ; भूतपूर्वी पासून लावणी ही लोककला राजाश्रय मिळविलेली असतांना, यात्रेत वा महोत्सवात लावणीचे फडातून सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेत.पण हल्लीच्या डिजिटल युगात डी.जे.संगीत लावून, बिभत्सक नृत्य आदाकारीने रसिकांची मने जिंकत हे जरी सत्य आसले तरी,पायात चाळ,ढोलकीची थाप,तुणतुण्याचे कोरस,व नटराज देवतेला वंदन हे काळाच्या ओघात लोप पावते का याची भिती निर्माण झाली. डिजिटल युगाच्या डी.जे.संगीतावर लावणी सादर होत असल्यामुळेच नृत्यांगणा आणि ढोलकी,तुणतुणे, तबला,टाळ यांचे संगीत वाद्यकार यांचेवर उपासमारीचे वेळ आली आहे.म्हणून शासनाने वेळीच दखल घेवून संगीतबारी, लावणीचे फड व लावणी नृत्यांना,त्यांना संगीत साथ देणारे संगीतकार यांना अभय देण्याची वेळ आली आहे.
यावर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी कंधारी आग्याबोंड सदरात सध्याचा लावणी कलावंताचा प्रश्न कंधारी आग्याबोंड सदर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार