मुखेड: (दादाराव आगलावे)
श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेड येथे गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व यांच्या मार्गदर्शनाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक 9 ते 16 डिसेंबर दरम्यान आयोजिला आहे.
या सप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड स्वामी चरित्र, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. श्री दत्त जयंतीच्या दुपारी 12 :39 मिनिट दत्तजन्म व दुसरा दिवशी महानैवेद्य व महाआरती करण्यात येतो. पंचक्रोशीतील घेतात. सप्ताह दि. 9 डिसेंबर रोज सोमवारी सुरुवात झाले असून दि. 16 डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. गुरुचरित्र पारायणला असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अतिउच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदविला आहे करोडो लोकांना प्रहर सेवेचे अप्रतिम अनुभव आले आहेत.
प्रहरच्या माध्यमातून सेकंदा- सेकंदाला पुण्य मिळत अस दरम्यान प्रहरच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचेकाम स्वामी महाराज करत असतात म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रहरच्या सेवेला उपस्थित राहावं. असे केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येकाने प्रहर सेवा करावीच पण त्यासोबत कमीत कमी ५ तरी नवी व्यक्तींना आपल्यासोबत मार्गात आणून महाराजांची सेवा व आपल्या जीवनातील अध्यात्मिक सेवेद्वारे आत्मशांती वाटचाल अनुभव घेण्यासाठी व तसेच मार्गातील मार्गदर्शक देखील केंद्रात सांगितला जातो. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण व इतर सेवा शिस्तीमध्ये करून सहकार्य करावे असे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेडच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.