घोडज येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

कंधार ; प्रतिनिधी

तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कंधारव्दारे मौजे घोडज येथे लोकसहभागातून वनराई बंधारा साकारण्यात आला.यावेळी घोडज येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,गावकरी व विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कंधारद्वारे सध्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी दिनांक ३०-११-२०२४ ते १४-१२-२०२४ या कालावधीत जागृती मोहीम सुरू आहे.यां संदर्भातही यावेळी उपस्थितांना माहीती देण्यात आली.यावेळी वनराई बंधारा उभारला तथा शालेय विद्यार्थ्यांनी फलक बनवुन गावातुन जल व वृक्षसंवर्धनाबाबत घोषणा देत नागरीकांचे लक्ष वेधुन घेतले.सदरील कार्यक्रम मा.तालुका कृषी अधिकारी श्री.भारत वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी कृषी पर्यवेक्षक कंधार-१ श्री.जी.बी.काळे यांनी अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचना सहीतच विवीध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी कृषी सहाय्यक राहुल गवळी व कृषी सहाय्यक अनुसया केंद्रे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती.डांगे आय.एन. सहशिक्षक. वाघमारे एस.एस.,श्री.पांचाळ जी.जे.,सौ.सगर व्ही.एस.,सौ.वाघमारे एम एस.,श्री मुनेश्वर एम.यु.,श्री.कांबळे एम एस,श्री.अमोल एंगडे व गावातील नागरिक हजर होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *