मुखेड: (दादाराव आगलावे)
मीनाक्षी हॉस्पिटल मदुराई, (तामिळनाडू) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विष परिषदेत (Intox 2024) डॉ. दिलीप पुंडे, मुखेड जि. नांदेड यांचे दि. 6 डिसेंबर 2024 रोजी ‘सर्पदंश, विंचुदंश आणि इतर विषारी दंशाचे निदान आणि आजची व उद्याची उपचार पद्धती’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानात डॉ. दिलीप पुंडे यांनी भारतातील सर्पदंशाची भिषणता, व्यवस्थापनातील अडचणी आणि उपचार पध्दती, प्रतिबंध यावर सखोल मार्गदर्शन केले.
या परिषदेत 20 देशांतील वक्ते आणि 250 तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. मागील 37 वर्षांत पुंडे हॉस्पिटल येथे 8000 सर्पदंश रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.1988 साली या भागात सर्पदंश मृत्यदर 25% होता तो 2023-24 या काळात 0% आहे. या कार्याची आणि व्याख्यानाची जगभरातील वक्ते आणि इतर श्रोत्यांनी प्रशंसा केली आणि अनेक डॉक्टरांसाठी हे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या कार्याबद्दल सुप्रभात मित्र मंडळ, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, वैद्यकीय संस्था, आय एम ए या संघटनासह डॉ. पुंडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.