प्राणी घरात पाळावेत का?

प्राणी घरात पाळावेत का ??
शास्त्र काय सांगतं ??
दोन दिवसांपूर्वी मी सिंबा नावाच्या डॉगीवर लेख लिहीला होता.. तो वाचल्यावर पुर्वा नावाच्या वाचक सखीचा फोन आला होता.. त्यांना लेख आवडल्याचं त्यांनी सांगितले आणि त्यांच्या डॉगीबद्दल त्या अशा काही भरभरून बोलत होत्या ते ऐकून त्यांची थोडी काळजी वाटली.. प्रचंड प्रमाणात त्यांची अटॅचमेंट् दिसली.. एकच मुल असल्यामुळे त्यालाही डॉगीची सोबत झाली .. आणि आता नोकरीसाठी तो बाहेर गेलाय तर मलाही करमणूक होते.. पुर्वा मॅम सारखी अनेक मंडळी आहेत ज्याना शास्त्र माहीत नाही आणि निसर्गही कळला नाही त्यामुळे अशी मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी प्राणी घरात पाळतात.. घरातील फरशी त्यांना चालत नाही.. त्यांना मोकळेपणाने जगायची सवय असते.. आपण घेउन जाऊ तेव्हाच ते बाहेर जाणार ..मुळात त्यांची जडणघडण निसर्गात होते.. त्यांचा आहार हाही निसर्गातच असतो.. त्यांची रहाण्याची जागा ही पण निसर्गात. त्यांना फरशीचा त्रास होतो.. ते खाऊन घरात बसल्यामुळे त्यांचं वजन वाढतं.. त्याचा त्यांच्या पायावर ताण येतो.. आपलं अन्न खाऊन त्यांना आजार होतात.. त्यांना मेडीसीन , इंजेक्शन याची गरजच नसते.. निसर्गाने त्यांची खाण्यापिण्याची सगळी सोय केली आहे .. त्यामुळे आपल्या इगोपायी आपण माणसाना दुर करतो आणि प्राणी घरात पाळतो आणि त्या प्राण्यात इतके इंव्हॉल्व्ह होतो की ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्यालाच विसरतो आणि सतत प्राण्यांची नावेच घेत रहातो.. शास्त्र सांगतं , घरात माउ ,भुभु पाळणं म्हणजे पुढचा जन्म आपण त्याच जन्मात घेणार हे आपण ठरवुन टाकतो.. हे श्रीमद्भागवत मधे सांगितले आहे.. माझ्या मनाचं मी काहीही सांगत नाही.. भगवंताने प्रत्येकाची सोय केली आहे.. जसं काही जण म्हणतात , आपण मासे खाल्ले नाहीत तर त्यांची पैदास वाढेल पण तसं अजिबात नाही कारण प्राणी एकमेकांना खातात .. शाकाहार हे आपले अन्न आहे.. पण बाहेर दिसलेल्या प्राण्याला काही मदत लागली तर जरुर करा असही सांगितले आहे.. प्रेमानंद महाराज नेहमी त्यांच्या व्हीडीओमधे हे सांगतात.. जरुर ऐका.. गाय पाळा हेही तेआवर्जून सांगतात.. घराबाहेर एखाद्या प्राण्याला खायला द्या आणि त्यात जीव न अडकवता बाजूला व्हा.. जीव अडकवायचाच असेल तर तो फक्त भगवंतामधे अडकवा.. प्रेम करायचच असेल तर त्याच्यावर करा कारण मनुष्य जन्माचा एकमेव उद्देश म्हणजे भगवदप्राप्ती.. भगवदधामात जाऊन पुन्हा कुठल्याही जन्मात पृथ्वीवर न येणे याची तयारी आपल्या प्रत्येकाला करायची आहे.. कलियुगात त्यासाठी हरिनाम हेच श्रेष्ठ आहे.. सतत भगवंताच्या सानिध्यात राहून इतर गोष्टीपासून दुर राहिल्याने दुख अजिबात नाही.. मिळेल तर तो फक्त आनंद .. तुम्ही म्हणाल , फॉरेन मधे हा नियम नाही का ?? तिथे शास्त्र नाही का ??.. भगवंत सगळ्याचा एकच त्यामुळे कर्मानुसार सगळ्याना सारखीच फळं मिळणार आणि त्यानुसारच पुढचा जन्मही मिळणार.. उलट अशा लोकांचं किवा त्यांच्या कृतीचं अनुकरण करण्यापेक्षा भगवंताचं अनुसरण करा.. शास्त्र आणि निसर्ग जाणून घेउन माणसाना जवळ करा.. म्हणजे प्राणी घरात आणायची गरजच लागणार नाही.. आपण जसे वागतो तसंच समोरची व्यक्ती वागणार .. सगळेच आपल्या हातात असताना दोष इतरांना का ??..
पुन्हा एकदा विचार करा….
भगवद्गीतेतील आठवा अध्याय वाचा.. भगवंताचे आयुष्यभर स्मरण केल्याने विशेषकरुन मृत्यूसमयी स्मरण केल्याने मनुष्यला परमधाम प्राप्ती होते..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *