अहमदपूर दिनांक 6 डिसेंबर ;
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६ डिसेंबर रोजी 68 वा महा परिवान दिन .
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूरने आज सकाळी ७:०० वाजता योगा मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या अभिवादन सभेचे अध्यक्ष छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे अध्यक्ष श्री एन डी राठोड हे होते.
याप्रसंगी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक गौतम वाघमारे, डी एस वाघमारे, श्री बालाजी दुगाने, ह भ प संजय महाराज नागपूरने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकूणच कार्य विशद केले. अध्यक्षीय भाषणामध्ये एन डी राठोड यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली भारताची राज्यघटना प्रत्येकाच्या घराघरात असली पाहिजे व राज्यघटनेचे पारायण करायला पाहिजे. छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप ने संविधान हे ग्रंथ आणलेले असून ते सदस्यांनी घरी घेऊन जावेत व सर्व कलमाचे वाचन करावेत जेणेकरून आपल्याला सर्व कलमांचे अभ्यास होईल. अभिवादन सभेचे सूत्रसंचालन सन्माननीय सदस्य गणेश वाघमारे सर यांनी केले तर आभार एलडी कांबळे यांनी मानले.