कंधार ; प्रतिनिधी
स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त कंधार आगार (बस डेपो) येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर, आगार व्यवस्थापक अभय वाळवे, पत्रकार रमेशसिंह ठाकुर, अॅड अंगद केंद्रे, चेतन भाऊ केंद्रे, संभाजीराव घुगे, आदींसह कंधार आगारातील कर्मचारी बांधव व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
छाया – विनोद महाबळे