नाशिक- ‘हल्ली गाणं आतून येत नाही!’ ह्या लेखसंग्रहाचे ज्येष्ठ साहित्यिक, वक्ता उर्मिला पवार यांचे हस्ते कांदिवली येथे प्रकाशन संपन्न झाले. वक्ता, साहित्यिक, एकपात्री नाट्यकलावंत बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या डॉ. प्रतिभा जाधव यांचे हे एकुणातील चौदावे पुस्तक आहे. सदर लेखसंग्रहासाठी प्रस्तावना व पाठराखण उर्मिला पवार यांनी केलेली आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उर्मिला पवार म्हणाल्या कि, १९७५ साली सुरु झालेलेया स्त्री मुक्ती चळवळीची शंभरी पूर्ण करताना ‘हल्ली गाणं आतून येत नाही!’ हा लेख संग्रह येणे ही महत्वाची बाब आह इसे मी मानते. कारण या पुस्तकातील लेख स्त्री जाणीवा, स्त्रियांचे प्रश्न व सुशिक्षित स्त्रियांकडून प्रागतिकतेबाबत असलेल्या अपेक्षा, समता याबद्दल भाष्य करते. लिंग, जात व्यवस्था व त्यानुरूप असणार व्यक्तिपरत्वे दृष्टीकोन यात भिन्नता आहे.
‘हल्ली गाणं आतून येत नाही!’ हे शीर्षक खरे तर सकारात्मक आहे असे मला वाटते कारण आतून गाणं येत नसेल तर ते आपसूक आतून यावं अशी डॉ.प्रतिभा जाधव यांना म्हणायचे आहे असे मला वाटते. ह्या पुस्तकात विषय वैविध्य आहे पण त्यांचा केंद्रीभूत तत्व हे ‘माणूस’ होणे गरजेचे, मानवी संवेदना, जाणीवा जिवंत असाव्यात, माणूसपण अबाधित राहावे त्यासाठी सर्व प्रकारच्या विषमता नष्ट करण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करावी.
तळागाळातील माणसांची मनं समजावून घेत त्यांच्याशी प्रेमाने बोला. धाक, दडपशाहीने माणसांना तोडण्यापेक्षा, द्वेष पसरवण्यापेक्षा माणसं जोडणे हा सांप्रतकाळाचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. तेव्हाच अर्थाने आनंदाचे आणि माणुसकीचे गाणे आतून प्रत्येकाच्या ओठी येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रतिभा जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश निकम यांनी केले.