कंधार ; प्रतिनिधी
लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव द्या. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून माजी सैनिक संघटनेने लावून धरली आहे. त्याचबरोबर कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत हा रस्ता शंभर फुटाचा करावा या दोन प्रमुख मागण्यासाठी माजी सैनिक संघटना वारंवार आंदोलने करत आहे. दि २२ जानेवारी रोजी पर्यंत मागण्या प्रशासनाने मान्य करण्यात अन्यथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यालया समोर आत माजी सैनिक संघटना बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवदना द्वारे आज दिला आहे.
लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयास हे संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी सैनिक संघटना आक्रमकपणे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे. माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला होता. या नावासंदर्भात मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला आहे परंतु अद्यापही नाव देण्यात यश आले नसल्याने पुन्हा हीच मागणी धरून माजी सैनिक संघटना आक्रमक झाली आहे. कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत हा रस्ता शंभर फुटाचा असल्याने रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून हा रस्ता शंभर फुटाचा करावा या मागणीसाठी ही बालाजी चुक्कलवाड हे आग्रही आहेत.
सदरील रस्ता हा 100 फुटाचा असल्याचे सर्व पुरावे असूनही काही व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी राजकीय पुढारी हा रस्ता शंभर फुटाच्या ऐवजी 80 फुटाच्या करत असल्याने बालाजी चुक्कलवाड यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. यावर अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका होऊनही या बैठकीत कसल्याच प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने हा रस्त्याचे काम प्रलंबित आहे . या रस्त्याच्या पश्चिम बाजूस नगरपालिकेचे अनाधिकृत शॉपिंग सेंटर असल्यामुळे हा रस्ता 100 फुटाचा करण्यास मोठा विरोध होत आहे. असे असले तरी माजी सैनिक संघटना ही शॉपिंग सेंटर पाडून पाठीमागील मोकळ्या जागेत पत्राचे शेड मारून व्यापाऱ्यांना तात्पुरते दुकाने बांधून द्यावे व हा रस्ता शंभर फुटाचा करावा अशी मागणी वारंवार करत आहे .
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने हा रस्ता शंभर फुटाचाच करावा अन्यथा हा छोटा रस्ता होऊ देणार नाही असा हट्टच माजी सैनिक संघटने धरला आहे.तसेच लोहा उपजिल्हा रुग्णालयाला संभाजी कदम यांचे नाव द्या, महाराणा प्रताप चौक ते हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता करा.अन्यथा 22जानेवारी 2025 रोजी आमदार प्रताप पा. चिखलीकर यांच्या कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदनच माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.
प्रतापराव पाटील चिखलीकर हे मतदारसंघातील सर्व जनतेचे आमदार आहेत. लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शहीद संभाजी कदम यांचे नाव व कंधार येथील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता करणे हे त्यांच्यासाठी ही मोठी बाब नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी सैनिक संघटनेच्या मागणीला न्याय मिळवून द्यावे.
– बालाजी चुक्कलवाड माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष