धर्मापुरी ( प्रतिनिधी ) लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे एका समाजाचे नेते नव्हते तर ते बहुजनांचे नेते होते. असं प्रतिपादन प्रा डॉ रमाकांत गजलवार यांनी केले.
ते येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी येथे दि 12 डिसेंबर 24 रोजी आयोजित जयंतीनिमित्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची अध्यक्षपदी उपस्थिती होती. तर इतिहास विभाग प्रमुख प्रा चाटे एन एस यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पुढं बोलताना ते म्हणाले की गोपीनाथराव मुंडे हे कुणा एका जातीचे नव्हते. बहुजनांचे नेते होते. म्हणून ते लोकनेते ठरले. यावेळी प्रा चाटे एन एस यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विद्यार्थी या शब्दाचा अर्थ सांगून स्व गोपीनाथराव मुंडे यांचा जीवनपट उलगडून दाखवला.