LGBTIQ नैसर्गिक कि विकृती ??..

मुळात ब्रह्माजीनी जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हाच तृतीयपंथी यांची सुध्दा निर्मिती केली हे मी शास्त्रात वाचलं आहे.. एखाद्या पुरुषाला स्त्री आवडत नाही किवा स्त्री पाहिल्यावर त्याला तिच्याबद्दल काही फीलींग्ज नाहीत हे हॉर्मोन्स बदलामुळे होतं म्हणजे त्यांच्या शरीराच्या आतच हे बदल नैसर्गिकपणे घडत असतात.. आपल्याला त्यात विकृती दिसते कारण अनादिकालापासून पुरुष म्हणजे त्याने असच वागलं पाहिजे आणि बाई म्हणजे तिने तसच वागलं पाहिजे हेच नियम आपण फॉलो करत आलो आहोत.. त्या चौकटीच्या बाहेर जेव्हा आपण पहातो तेव्हा हेही आपण स्विकारु शकतो.. मलाही वाटतं एक पुरुष बाईकडेच आकर्षित व्हायला हवा आणि बाई पुरुषाकडे पण असं नाही झालं की विकृती हा शब्द वापरुन आपण मोकळे होतो..
तोच मुद्दा तृतीयपंथी यांचाही आहे.. शरीर पुरुषाचं आणि मन स्त्रीचं त्यामुळे त्यांना साडी नेसावी वाटते , मेकअप करावा वाटतो.. इथेही हॉर्मोन्सचाच मुद्दा येतो.. समाज त्यांना हिजडा ,छक्का असं हिणवतं पण आपण हे विसरतो कि त्यांचा जन्म आपल्यासारख्या आईवडिलांच्या पोटीच झाला आहे.. मग त्यांना मारहाण , शिवीगाळ करणारे आपण कोण ??.. एक गोष्ट वाचली होती.. प्रभुराम जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा वेशीवर पुरूष , स्त्रीया , तृतीयपंथी सगळे त्यांना निरोप द्यायला आले होते.. श्रीराम म्हणाले , स्त्री पुरुष सगळे घरी जा.. सगळे घरी गेले पण तृतीयपंथी तिथेच उभे राहिले.. राम म्हणाले , मी जायला सांगितले त्यावर ते म्हणाले तुम्ही पुरुष आणि स्त्रीयांना जायला सांगितले आमचं काय ??.. त्यावर प्रभु राम म्हणाले ,आतापासुन तुम्ही लोकांना दिलेला आशीर्वाद शुभ ठरेल .. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला चालतो पण त्यांच्यासोबत मैत्री चालत नाही असं का ??.. तीही माणसच आहेत ना.. त्यांनाही मन भावना आहेत..
आय म्हणजे इंटरसेक्स ..ज्या व्यक्तीला दोन्हीही लिंग असतात हेही कदाचित हॉर्मोन मुळे असेल किवा त्यांच्या कर्मामुळे असेल पण आता त्यांचा काय दोष? आणि तेही आपल्यासारख्या आईवडीलांच्या पोटीच जन्म घेतात.. मुलीला मुलगा न आवडता मुलगीच आवडते हाही तोच प्रकार आहे..
हे नवीन फॅड नसुन पुर्वापार आहे फक्त आता ते समाजासमोर आलय…यावर लिहीलं जातं .. बोललं जातं त्यामुळे आपल्याला ते प्रकर्षाने जाणवतं.. काही चांगल्या घरातल्या पुरुषांना स्त्रीयांचे कपडे घालावे वाटतात हाही हॉर्मोनचाच प्रकार असावा .. आपल्या शरीरात इतके सारे बदल सतत होत असतात आपल्याला याचा अंदाजही बांधता येत नाही.. या सगळ्या लोकांशी कामानिमित्त जेव्हा माझा संबंध येतो तेव्हा उघडपणे ते सगळं सांगतात कारण मीही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते.. वाकडी वाट करुन समाजातील भगवंताच्या या अंशाला जाणून घेउन पहा.. वेगळं रुप आपल्यासमोर येईल आणि त्यातील सत्यताही कळेल..
आदर हवा असेल तर आदर द्या..
प्रेम हवं असेल तर प्रेम द्या..
आपण पेरणार तेच उगवणार आहे.
सोच बदलो..
( तळटिप.. काही जणांच्या बाबतीत काही विचित्र घटनांचा इंपॅक्टही असू शकतो .. किवा काही वेळा किकृती किवा सुडाची भावनाहीअसू शकेल.. प्रत्येक गोष्टीला अपवाद हा आहेच )
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *