कंधार : प्रतिनिधी
बालवयात विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व विज्ञानिक संकल्पना ,दृष्टिकोन निश्चितीकरण होऊन भविष्यात देशाला वैज्ञानिक तयार करण्यात हेतूने राबविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाला बालवैज्ञानिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून कंधार येथील प्रियदर्शनी कन्या शाळेच्या घनकचरा व्यवस्थापन व संसाधन व्यवस्थापन या विषयावर राबवलेल्या प्रयोगाचा मोठ्या गटातून अशंराराहीन मोहम्मद सिकंदर,सय्यदा फरहा शफीक यांनी तर शिवानी आत्माराम लुंगारे व वैष्णवी धनराज लुंगारे यांनी सादर केलेल्या गणिताचे मॉडल सादरीकरणास कौतूकाचा विषय ठरला . प्रियदर्शनी कन्या शाळा कंधार च्या यशस्वी विद्यार्थिनींच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर, संजय भोसीकर, वर्षाताई भोसीकर, कृष्णा भोसीकर, मु अ किरण बडवणे यांनी सत्कार करून प्रोत्साहन दिले .
दि १८ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी श्री गणपतराव मोरे विद्यालय येथे गटसाधन केंद्र कंधारच्या वतीने ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते ,गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिक्षण विस्तारअधिकारी केंद्रे बि.एन.,केंद्रप्रमुख प्रवीण पाटील,मुंडे पांडुरंग,संजय वागलगावे,ओम प्रकाश यरमे,शिवकुमार कनोजवार,प्रशांत नरहरे,पी.जी.काळे,सोनकांबळे प्रतिभा, स्वामी ज्योती,मार्गदर्शका श्रीमती मीराताई शिरसागर प्रवेक्षक प्रवीण जोगे,अनिल वट्टमवार ,राजहंस शहापुरे, सौ.निलीमा यंबल ,अदीसह मान्यवरांची उपस्थिती होती .
विज्ञान प्रदर्शनात लहान गटातून पानशेवडी जिल्हा परिषद शाळेने आपला ठस्सा उमटविला त्यात स्वराज अनिल मोरे,आशिष माधव मोरे वर्ग ७ वा यांना प्रथम क्रमांक मिळाला तर
काटकळंबा जिल्हा परिषद शाळेतील वर्ग आठवीच्या ऋतुजा गणेश यलगलवाड, गायत्री गोविंद पानपट्टे यांचा दुसरा क्रमांक आणि वैष्णवी विठ्ठल नागपलडे,प्रांजल संजय देवकांबळे वर्ग ८ वा जि प शाळा गऊळ तिसरा क्रमांक मिळवला तर मोठ्या गटातून १) वडजे रुपेश रावसाहेब ओकांर डाके वर्ग १० वा श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बारुळ प्रथम क्रमांक,२) प्रतीक्षा बापूजी भरकडे दुसरा क्रमांक वर्ग ९ वा जि प शाळा काटकळंबा तर अंशराराहीन मोहम्मद सिकंदर , सय्यदा फरहा शफीक वर्ग ९ वा प्रियदर्शनी मा. व उ.माध्यमिक कन्या शाळा कंधार तिसरा क्रमांक असे पटकावले आहे.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संजय येरमे आणि बाल वैज्ञानिकांची संवाद साधला . भविष्यात देशाला वैज्ञानिक मिळण्यासाठी शालेय जीवनात राबवणारे विविध उपक्रम कार्यक्रम आणि प्रदर्शनातून बुद्धीचा विकास होतो व आपल्याला यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर सोळुंके यांनी केले तर आभार डॉ.प्रवीण गव्हाणे यांनी मानले.लवकरच या यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असल्याची माहिती देण्यात आली.