कंधार ; प्रतिनिधी
दि. 18/12/2024 रोजी
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कंधार येथे आयोजित करण्यात आले होते .9 ते 12 मोठ्या गटातील श्री शिवाजी विद्यालय बारूळ ने प्रथम क्रमांक मिळविला.
इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी रुपेश रावसाहेब वडजे ने उत्कृष्ट प्रयोगाच्या सादरीकरणातून *प्रथम क्रमांक* मिळविला यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री अनित वट्टमवार सर ,विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे श्री वाघमारे सर ,श्री सूर्यवंशी सर, श्री अजित बंडेवार सर ,व रुपेश वडजे या विद्यार्थ्याचे कौतुक करत *संस्थेचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब , उपाध्यक्ष मा. माधवरावजी पेटकर साहेब सचिव मा.गुरुनाथरावजी कुरुडे साहेब , सहसचिव मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब व शालेय समितीचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील कळकेकर उपाध्यक्ष संजय पाटील जाधव यांनी अभिनंदन केले.**