नागपूर दि. १९ विदर्भ – मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना शेतीशिवाय इतर उत्पन्नाचे खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ – मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी पुरवणी मागणीद्वारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार अॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेल्या आ. अॅड.श्रीजया चव्हाण यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. यावेळी आ. अॅड.श्रीजया चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीत बोलतांना पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी आ. अॅड.श्रीजया चव्हाण म्हणाल्या की,विदर्भ – मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी प्रतिदिवस ३ लाखावरून पाच लाख लिटर अशी वाढ झाली होती.पशुपालक पूरक व्यवसायातही वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यास मंजुरी मिळाली असली तरी आर्थिक निधीची तरतूद नाही दुसऱ्या टप्प्यात किमान ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्द करून द्यावा अशी मागणी आमदार अॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे.