जेव्हा आपण एखाद्यावर अगदी हृदयापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा दुरवर असलेला सहवासही आपल्याला या गुलाबी थंडीत कॉफीच्या गरम घोटाची अनुभुती देतो.. तिला माहित होतं तो सोबत आहे पण आज जवळ नसणार आहे.. आज मिठीही नाही आणि स्पर्शही नाही.. फक्त दुरुन मिळणारा प्रेमाचा अत्युच्च आनंद.. काही क्षण अबोल असतात तसाच हाही एक क्षण तिच्या ह्रदयात पिसारा फुलवुन गेला.. वयाच्या याही टप्यावर तो तिला तरुण करुन गेला.. मला माहित आहे , त्या फीलींग्ज मला लिहीता येणार नाहीत कारण त्या तिने त्याच्यापासून लांब बसून अनुभवल्या होत्या.. कार्यक्रमाचा मधला ब्रेक कॉफी ब्रेक म्हणुन अनाउंस झाला आणि त्याच्या हातातील कॉफीचा कप तिला त्याच्याजवळ बोलवु लागला .. रोज एका कपात कॉफी प्यायची त्यांची सवय दोघांना सतावु लागली.. त्याने हातात कप घेउन तिला घातलेली साद तिच्यापर्यत सहज पोचली आणि तिचं हृदय स्पीडने धावु लागलं.. दोघांना हुरहूर लागली आणि नाइलाजाने दोघांनी एकत्र आपापले कप तोंडापाशी नेले.. त्याच्या मनात माजलेला काहूर फक्त तिलाच समजला होता आणि मनाने ती त्याच्या उष्ण श्वासात घुसली पण.. तिला रहावेना आणि तितक्यात निवेदिकेने कार्यक्रम पुढे नेला आणि इतका वेळ गरम असलेली कॉफी एका क्षणात थंड झाली .. त्याच्या कॉफीतुन तिच्या कॉफीत येणाऱ्या प्रेमाच्या लहरी त्या दोघांनी मनमुराद अनुभवल्या ..
आपण एखाद्याला मिस करतोय हे त्यालाही समजणं यासारखं सुख नाही आणि दोघांनाही एकावेळी ते जाणवणं यासारखं समाधान नाही.. कॉफीच्या ब्रेकमधे त्यांची झालेली नजरानजर ही तिथे कोणालाही समजली नसली तरी त्यांचं प्रेम त्या सपूर्ण हॉलमधे मुक्तहस्ताने बागडत होतं.. तिला कार्यक्रमापेक्षा त्याला भेटण्यात रस होता आणि जेव्हा त्याने तिला साडीत पाहिलं तेव्हा वाटलं असेल काही क्षणासाठी सगळं व्हॅनीश व्हावं आणि ते दोघेच तिथे असावेत.. त्याने एखादं सुंदर रोमॅन्टिक गाणं तिच्यासाठी गावं आणि तिने त्याच्या मिठीत विरघळून जावं.. तितक्यात टाळ्यांचा आवाज ऐकून ती भानावर आली आणि हळूच लाजली.. तो त्याच्या जागेवर बसला होता आणि ती तिच्या जागेवर.. कार्यक्रम संपल्यावर
तिला त्याला स्पर्श करायचाच होता.. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाय केलं आणि एखाद्या गोमाशीच्या स्पीडने तो तिच्याजवळ आला .. तो कुठे आहे हेही विसरला बहुधा.. ती हळूच love yu म्हणाली पण ते त्याच्या पर्यंत पोचलं की नाही माहित नाही . तिथून निघताना त्याने दिलेला एक लुक हा तिच्यासाठी लव्हयु पेक्षा मौल्यवान होता.. त्याच्या त्या लुक मधे काय असेल ??.. पाहु तुम्ही काय लिहीता…..
तुमच्या कल्पना शक्तीतुन काय बाहेर पडतं ते वाचायला मला आवडेल..
त्याने तिच्यासाठी कुठलं गाणं गायलं असेल ??
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist