कंधार ; प्रतिनिधी
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या निधीतील सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोसी तालुका कंधार येथे सी.सी. रोड च्या (सिमेंट रस्ता) कामांचा शुभारंभ नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कंधार तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, सरपंच सौ. राजश्रीताई भोसीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव परदेशी, माजी सरपंच बालाजीराव भातमोडे , मन्मथ नाईकवाडे, शिवराज पाटील भोसीकर, बाबाराव पाटील लुंगारे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख रशीद, पोलिस पाटील, शेख इसाक, शंकरराव घोडके आदींसह निसर्ग सेवा मंडळ व गावातील नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .
छाया – विनोद महाबळे