हॅलो… हॅलो.. हॅलो..
मॅम तुम्ही काय करता ?? समोरून विचारलं गेलं
मी कुठे काय करते.. तुमच्याशीच बोलतेय
तसं नाही हो म्हणजे पोटापाण्यासाठी काय करता ??
काहीही नाही.. मी म्हटलं .. जरा चेष्टेच्या मुडमधे
मग खाता काय ??
भाजी भाकरी.. मी म्हटलं
ते कुठून आणता ??
अहो भाजीवाल्याकडुन
म्हणजेच तुम्ही काहीतरी करता.. पैशासाठी
अहो खरच काही नाही.. थोडी त्याची खेचावी वाटली
सोनल मॅमच बोलताय ना ??.. मी म्हटलं , हो बरोबर..
मग ती पुस्तक कोणी लिहीली ??.. ये हुई ना बात म्हणजे मी लेखिका आहे हे तुम्हाला माहित असुन तुम्ही काय करता हा प्रश्न का विचारला ??.. सहज विचारला मॅम .. मग मी पण सहजच उत्तरं दिली कि.. तुम्ही पण भारीए राव.. ( दोन्हीकडून मनात आलं असावं ) काउंसीलींग पण तुम्हीच करता ना ??.. तुमचे यूट्यूबवर व्हीडीओ पाहिले .. मस्त माहिती देता तुम्ही.. मी Thanku म्हणाले.. मॅम एक प्रश्न होता .. विचारु का ?? मी म्हटलं , बोला .. माझं लिंग लय बारीक आहे ते मोठं करता येईल काय ??.. अहो , लैगिकते बाबत काउंसीलींग हवं असेल तर पे करुन अपॉइंटमेंट घ्या.. हे मी बोलल्यावर लगेच ते म्हणाले ,
तुम्ही ब्राह्मण का ??.. मी म्हटलं , माहीत नाही.. मी जात धर्म मानत नाही आणि त्याचा इथे काय संबंध ??.. तसं नाही मॅम , मी कुलकर्णी साताऱ्यात असतो म्हणुन विचारलं.. त्यांना म्हटलं , फुकट माहीती हवी असं सांगा ना.. तसं नाही मॅम अहो मी ३१ वर्षांचा आहे आणि मला मुलगी भेटत नाही.. तुमच्या नात्यात कोणी असेल तर सांगा.. खुप जोरात हसले आणि म्हटलं , आता तितकच करायचं बाकी आहे.. मी म्हटलं , कशी हवी मुलगी ??.. सुंदर हवी , हुशार हवी , नोकरीवाली हवी.. हे समोरून उत्तर आलं
आता सांगा तुम्ही काय करता ??.. मी विचारलं
काही नाही.. समोरून उत्तर आलं
म्हणजे नोकरी / व्यवसाय ??
काही नाही ..
अहो ही माझी उत्तरं आहेत.. मी म्हणाले
नाही मॅम.. ही माझी उत्तरं आहेत..
म्हणुन तर नोकरीवाली मुलगी हवी म्हणालो मी…
मनसोक्त हसले.. आणि फोन ठेवताना म्हटलं .. इथे भेटलास बाबा वर भेटु नकोस.. असे अनेक प्रसंग सतत येत असतात आणि मनमुराद आनंद देत रहातात.. म्हटलं तुम्हालाही हसवावं सकाळी सकाळी..
काय झालं ????.. काहीही कळलं नाही ना.. ??.. काल हा फोन कशासाठी होता हे मलाही कळलं नव्हतं.. आणि
अजूनही कळलं नाही.. काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या.. त्यातील ही एक गोष्ट.. पुन्हा असा कॉल नको म्हणुन नंबर ब्लॉक केला आहे..#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist