कंधार ; प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध स्पर्धेच्या परीक्षा देऊन विद्यार्थ्यांच्या बौध्दीक कुवतीचा कस लावण्यासाठीच ज्युनियर वैज्ञानिक बनण्यास होमी भाभा विज्ञानाच्या आभ्यासावर अधारीत परीक्षा घेतली जाते.यंदा या परीक्षेचे सेंटर पहिल्यांदाच कंधार शहरातील नामांकित श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळेराड कंधार या ज्ञानालयात सेमी विभाग प्रमुख अजहर बेग सर यांच्या अथक परिश्रमाने होमी भाभा परीक्षेचे केंद्र घेऊन १५८ परीक्षार्थी बसले होते.श्री शिवाजी हायस्कूलचे इयत्ता ६ वी अ सेमिचे उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत नागनाथराव जाधव,कु.सीनाक्षी विठ्ठलराव सर्जे, कु.अन्वयी भगवानराव जाधव व कु.आराध्या राजू आंबुलगेकर या चार चिमुकल्यांनी यश मिळविले.
तर इयत्ता ९ वा अ सेमी वर्गातील कु.प्रतिक्षा संग्रामजी मुसळे व कु.तनिष्का महेश कुमार एमेकर या दोघी उत्तीर्ण झाल्या. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कंधार शहरातील नामांकित जाधव हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅक्टर भगवानराव जाधव सर यांच्या समर्थ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.डाॅ.भगवानराव जाधव सर यांनी ३२ कॅमेर्याचे डीव्हीआर आणि फिटिंग सहित दहा-बारा टेहळणी डोळे भेट स्वरुपात देवून आपली दानशूर वृत्ती दाखवून शाळेविषयी प्रेम प्रगट केले.त्या बद्दल अन् प्रमुख पाहूणे म्हणून मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांनी शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला.गोविंदराव अन्नकाडे सर यांचे तर्फे मान्यवरांच्या समर्थ हस्ते गणित विषयात ४० पैकी ४० गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा लेखनी देवून सत्कार केला.
प्रसंगी मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक सुरेश ईरलवाड सर,उपप्राचार्य प्रा.मुरलीधर घोरबांड सर,प्रा.विद्याताई फड मॅडम,प्रा.वरपडे,प्रा.बामणे सर, पर्यवेक्षक आनंदराव पाटील भोसले सर,शेख आयनोद्दीन सर,अजहर बेग सर ,वैभव कुरुडे सर,भास्करराव आकुलवाड सर ,मैनोद्दीन सर, संग्राम जाधव सर, भीमसेन आचार्य आर्य, उपलंचवार, सुभाष माळी,संदीप मजरे,मन्मथ पेठकर, संदीप पा. आवाळे,जायभायेताई आदीजण उपस्थित होते.