कंधार शहर पथ विक्रेता समीती निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टीच्या एकता पॅनलचा विजय

 

 

कंधार ; संतोष कांबळे

शासनाच्या वतीने पथ विक्रेता समितीची नव्यानेच नेमणूक केली असल्याने. या समितीच्या सदस्य पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी नगरपरिषद कार्यालय येथे पार पडली. या निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टीच्या एकता पॅनल ला दणदणीत विजय मिळाला असून सहा पैकी सहा जागेवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण आठ जागा होत्या एसटी प्रवर्गातील व अपंग महिला प्रवर्गातील उमेदवार नसल्याने या दोन जागा रिक्त ठेवण्यात आले आहेत. सहा जागे पैकी तीन जागा ह्या बिनविरोध निघाल्याने तीन जागेवर मतदान झाले. यातील तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

 

कंधार पथ विक्रेता समिती निवडणूक नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली.१९ डिसेंबर रोजी सहा जागेसाठी मतदान घेण्यात आले.यात अल्पसंख्यांक गट एक, सर्वसाधारण गट तिन, ओबीसी गट राखीव एक, अनुसूचित जाती पुरुष राखीव एक अशा सहा जागा होत्या. यातील तीन जागेवर विरोधी पॅनलचे फॉर्म चुकल्यामुळे सुमन घनश्याम शिनगारपुतळे, सय्यद मोसिन सय्यद मोईन,श्रीहरी राजा ढवळे या तीन जागेवर सेवा जनशक्ती पार्टीचे उमेदवार बिनविरोध निवडले.

तहसीलदार तथा प्रशासक रामेश्वर गोरे निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयात मतदान पार पाडले. यात एकूण २०४ मतदारांपैकी १६३मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अल्पसंख्याक गटातून शेख मगदूम नजमुद्दीन यांना १११मते पडली,शेख अकबर पटवेधर यांना १०५, शेख सोहेल मगदूम यांना १०९ मते पडली. यामध्ये तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. पथविक्रेता मतदारांनी एकजूट दाखवून एकाच पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून दिले आहेत.

 

विधानसभा निवडणूक तांत्रिक कारणाने हरलो असतो तरीही माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून माझ्यासोबत निवडणुकीला सामोरे गेले अशा कार्यकर्त्यांसाठी मी येणाऱ्या काळात सोबत राहून प्रत्येक निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. माझ्या पत्नीचे दुःखद निधन झाले असल्यामुळे मी या निवडणुकीत सक्रिय नसलो तरी माझे पदाधिकारी हे सक्रिय होते. येणारी नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच आगामी २०२९ मध्ये होणारी लोकसभा आणि विधानसभा ही निवडणूक पूर्ण ताकतीने महाराष्ट्रात लढवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सेवा जनशक्ती पार्टीचे रजिस्टर झाल्यानंतर हा पहिलाच पक्षाचा विजय कंधार मधून मिळाला आहे.

प्रा. मनोहर धोंडे,सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *