नांदेड / प्रसिध्दी प्रमुख / महाराष्ट्र राज्य शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी सरोदे बी . एस . यांची निवड करण्यात आली .
नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक गुरुवार दि . १९ डिसेंबर रोजी नांदेड येथील तेजस हॉस्पिटल मालती हॉल येथे जिल्हा अध्यक्षा विजया घिसेवाड यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली .
या बैठकीस राज्य उपाध्यक्ष सुधीर गोडघासे , राज्य संघटक बालाजी डफडे , राज्य समन्वयक विठ्ठल ताकबिडे, जिल्हा सरचिटणीस रमेश गोवंदे , शेख मगदुम , जिल्हा सल्लागार मदन नायके , नारायणराव शिखरे , माधव वाघमारे , प्रल्हादराव कदम , प्रभाकरराव कमटलवार , डी . एम . नामेवार यांची प्रमुख उपस्थिती होती .या बैठकीत सेवानिवृतांचे उपदान , अंशराशीकरण त्वरीत मान्य करावे, सातवा वेतन आयोग ,भविष्य निर्वाह निधी चौथ्या ,पाचव्या हप्त्याच्या रक्कमा मिळाव्यात जिल्हा गुरुगौरव प्राप्तांना एक वेतनवाढ मिळावी आणि पेन्सेन आदालत दरमहिन्यास व्हावी आदी मागण्यावर चर्चा करून या बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचे निश्चित होऊन जिल्हा कार्यकारिणीतील रिक्त पदी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बी . एस . सरोदे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी शिवाजीराव इंगळे , जिल्हा कार्याध्यक्ष एम . बी . शेख , जिल्हा समन्वयक गंगाधरराव मावले,प्रसिध्दी प्रमुख म्हणून बी . एस . सरोदे विभागिय सहसचिव पदी चंद्रकांत शिन्दे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले . या बैठकीस जिल्ह्यातील तालुका शाखेचे पदाधिकारी,सभासद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती