*कंधार : प्रतिनिधी संतोष कांबळे*
तालुक्यातील बोरी (बु) येथील सरपंचासह अन्य दोघांनी राहत्या घरास बांधकाम परवाना देण्यासाठी पैशाची मागणी करून बांधकाम करण्यास अडवणूक केली शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने बोरी येथील महादाबाई बालाजी डूकरे वय (४६ वर्ष) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरी येथील शेत गट क्र. २६४ गायरान जमीनीचा पट्टा शासनाने शंकर देवराव पांचाळ रा. बोरी (बु) येथे १९९० पासून चार गुंठे जागेत कच्चे बांधकाम करून महादाबाई डुकरे हे राहत होते. या जागेच्या वादात २००२ साली कच्चा बांधकामाची मोडतोड केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती परंतु गावकऱ्यांच्या मध्यस्थीने तो प्रकरण मिटवले. आमचे राहते घर कच्चे असल्याने व ते दुरुस्त करण्यासाठी घराचा मालकी बाबतचा उतारा सरपंच यांना मागीतला असता सन २०१९ मध्ये ग्रामसेवक यांनी मालमत्ता क्र. ३५६ अन्वये ८ अ चा मालकी पुरावा दिला. परंतु त्यावर दिनांक टाकुन दिला नाही. पुन्हा सरपंच बालाजी झुंबाड यांनी माझ्या वडीलास ओरीजनल ८ अ उतारा व बांधकाम परवाना देण्यासाठी ५ लाख रुपयाची मागणी करत असल्याने सततच्या अपमानास्पद वागणूक शिवीगाळ धमकी घर पाडणार असल्याच्या घर पाडल्यानंतर आमचे कसे होईल असा विचार करून सरपंच व अन्य दोघांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार व्यंकट बालाजी डुकरे वय २९ वर्ष रा बोरी यांनी कंधार पोलीस ठाण्यात दिली असता बालाजी झुंबाड (सरपंच), ज्योती पांचाळ, विठ्ठल पांचाळ तिघे राहणार बोरी (बु) यांच्या विरुद्ध २२ रोजी ३ वाजता विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंधार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खजे हे करीत आहे.
तालुक्यातील बोरी (बु) येथील महिलेने सरपंचाच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आपले जीवन यात्रा संपवली. मयत महिलेचे मुले,पती व नातेवाईक आणि गावातील काही नागरिकांनी या महिलेच्या मृत्यूस सरपंच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच येथील प्रशासनसुद्धा जबाबदार असल्याचेही सांगितले. जोपर्यंत आरोपी सरपंचास अटक करणार नाहीत तो पर्यंत स्वईछेदन आम्ही करू देणार नाही असे नातेवाईक, गावातील नागरिक, महिला पोलिस स्टेशन कंधार येथे तळ ठोकून बसले होते.